इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना प्रसिध्दीपत्रक scolarship exam adhisuchna
संदर्भ
1. इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/5221, दि. 27/10/2025.
2. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांचे परिपत्रक क्र. CBSE/CTET/Feb/2026/e-73223, दि. 24/10/2025.
3. शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत बदलाबाबत प्राप्त निवेदने,
उपरोक्त संदर्भ क्र. । अन्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 08/02/2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती.
तथापि संदर्भ क्र. 2 अन्वये केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) दि. 08/02/2026 रोजी आयोजित केली आहे. सदर परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने त्यांना सदर परीक्षा देता यावी याकरीता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 08/02/2026 ऐवजी दि. 22/02/2026 रोजी घेण्यात येणार आहे.
उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.










