दि.०२ जून २०२५ ते १२ जून २०२५ पर्यंत वरिष्ठ निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांना १० दिवसाची अर्जित रजा मिळणेबाबत varishtha nivadshreni vetan training 

दि.०२ जून २०२५ ते १२ जून २०२५ पर्यंत वरिष्ठ निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांना १० दिवसाची अर्जित रजा मिळणेबाबत varishtha nivadshreni vetan training 

विषय: दि.०२ जून २०२५ ते १२ जून २०२५ पर्यंत वरिष्ठ निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांना १० दिवसाची अर्जित रजा मिळणेबाबत.

संदर्भ श्री. विठ्ठल चव्हाण, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक सेना, राज्य शाखा महाराष्ट्र व इतर यांचे पत्र दि. १८.०६.२०२५

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) नुसार एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्यांचा हक्कदार असुनही एखाद्या वर्षात पुर्ण मोठ्या सुट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टांच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल अशी तरतूद आहे.

ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण (गृहपाठासह) पुर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) मधील तरील नियमानुसार कार्यवाही करावी.

Leave a Comment