शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाह्य-मूल्यांकन मुदतवाढ देणेबाबत sqaaf mulyankan arakhada
संदर्भ : १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/ एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SSSA)
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SQAAF)
३. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाबतची माहिती (SQAAF) लिकमाये
भरण्याबाबत पत्र जा.क्र. रारीसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२४-२५/००५८२ दिः०३.०२.२०२५
४. पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/८७/२०२५-5SSA I/१३१३९२१/२०२५दिः ०४.०७.२०२५
५. पत्र जा.क्र. राशैसंप्रपम / SCERT/141/2025-SSSA/I/1351205/2025/दि. ३१.०७.२०२५
६. पत्र जा.क्र. रागैसंप्रपम/ SCERT-५१.०/१६/२०२५-SSSA/१/१५४७६७९/२०२५दि.१८.११.२०२५
उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयानाये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ०२ च्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SQAAF) तयार करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ०२ ला अनुसरून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या (शासकीय, खाजगी अनुदानित व खाजगी विनाअनुदानित किंवा स्वयं-अर्थसहाय्यीत, सर्व माध्यमाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन (१००% शाळा), बाह्य-मूल्यांकन (स्वयं-मूल्यांकनातील १००% शाळांपैकी एकूण ५% शाळा) व त्रयस्थ पक्षाकडून मूल्यांकन (५% शाळांच्यापैकी १०% शाळा) करण्यात येणार आहे. त्यानुसार संदर्भ क्र. ०३ ने स्वयं मूल्यांकन ची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती व दिः ३०.०६.२०२५ पासून स्वर्य-मूल्यांकनाची लिंक बंद करण्यात आली आहे. स्वयं-मूल्यांकनाचा टप्पा पूर्ण केल्याने त्यानंतर बाह्य-मूल्यांकनाचा टप्पा सुरु करून पूर्णत्वास आणणे अपेक्षित आहे.
करिता, संदर्भ क्र. ४ ने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये स्वयं-मूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांचे बाहा-मूल्यांकन हे १५ जुलै, २०२५ ते ३१ जुलै, २०२५ च्या दरम्यान करून घेण्यासाठी सूचित करण्यात आले होते. संदर्भ क्र. ६ व ७ च्या पत्रान्वये ३१ जुलै २०२५ व १५ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी मुदतवाढ देणेबाबत या कार्यालयास कळविण्यात आले आहे.
तरी या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते कि, आपल्या जिल्ह्यातील निवडपात्र शाळांचे बाह्य मूल्यांकन करण्यासाठी दि. २२ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील निवडपात्र शाळांचे बाह्य-मूल्यांकन विहित कालावधीत १००% होईल याची दक्षता घ्यावी.











