मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत mazi shala sundar shala
संदर्भ: १. शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दि. १६ ऑक्टोबर, २०२५
२. या कार्यालयाचे पत्र क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४, दि. ३०/१०/२०२५ ३. शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/ एसडी-६, दि. १५ डिसेंबर, २०२५
संदर्भाधिन विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ हे अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत आहे.
संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये सदर अभियान राबविण्याबातच्या सर्वकष सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदभर्भीय शासन निर्णय दि. १५/१२/२०२५ अन्वये शाळांच्या गुणांकनाबाबतच्या सुधारित सुचना देण्यात आलेल्या आहेत.
उक्त प्रकरणी दोन्ही शासन निर्णयातील सुचना आपले स्तरावरुन सविस्तर गुणांकन करणा-या समितीच्या निर्दशनास आणून द्याव्यात. तसेच दि. १६/१०/२०२५ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४ मध्ये नमूद उपक्रमाबाबत शाळेमध्ये राबविण्यात येणा-या केंद्र व राज्यशासनाच्या उपक्रम/अभियान/योजनांची अद्ययावत स्थिती गुणांकन करताना विचारात घेण्यात यावी.
तथापि आज दि. १९/१२/२०२५ रोजी ३८०२२ शाळांनी माहिती भरण्यास सुरुवात केल्याने दिसून येते तर २६६७६ शाळांनी माहिती अंतिम केलेली आहे. प्रलंबित शाळांना माहिती अंतिम करण्यास दि. २९/१२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी माहिती अंतिम होईल याची दक्षता घेण्यात यावी.
येईल. केंद्रस्तरावर मुर्त्यांकनासाठी समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) यांच्या लॉगिनला दि. २५/१२/२०२५ रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल.










