संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत sanvidhan amrut mahotsav 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत sanvidhan amrut mahotsav 

संदर्भ- १) शासन परिपत्रक क्रमांकः बीसीएच-२०२४/प्र.क्र. २५९/शिक्षण-२ दिनांकः १८ नोव्हेंबर, २०२५

शासन परिपत्रक pdf download 

२) मा. आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क. आशिका-२०२५/आस्था-क-माध्यमिक, दि.२५.११.२०२५

३) नॅश्मल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस, (NDMJ), ठाणे यांचे पत्र दि.९.१२.२०२५

उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र.१ चे शासन परिपत्रक व मा. आयुक्त कार्यालयाचे संदर्भ क्र.२ चे पत्र पहावे. (संलग्न) संदर्भ क्र.१ चे परिपत्रकातील, राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित /विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव “पर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत दि. २६ नोव्हेंबर २०२५ ते दि. २६ जानेवारी २०२६ या कालावधीत खालीलप्रमाणे स्पर्धा / उपक्रम / कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्याबाबत प्राप्त निर्देशान्वये आयुक्त कार्यालयामार्फत संदर्भ क्र.२ चे पत्रान्वये सर्व क्षेत्रिय कार्यालयांना यापूर्वीच कळविण्यात आले आहे. संदर्भ क्र.३ च्या निवेदनामध्ये शासन परिपत्रक दि.१८.११.२५ मधील सुचनांचे तंतोतंत पालन करावे व शासन निर्देशंचे पालन न करणा-या संबंधितांना निर्देश दयावेत असे नमूद केले आहे.

उपरोक्त नमुद मुसार, शालेय शिक्षण विभागांतर्गत येणा-या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च

माध्यमिक शाळांमध्ये पुढील उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

१. शाळा/महाविद्यालये/बसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे.

२. शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका / उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे, ३. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देणे.

४. भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, संविधान सभा निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, मुलभूत

कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे).

५. विद्याध्यर्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, मुलभूत हक्क आणि मुलभूत कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे.

६. कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे,

७. संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा.

८. संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, धादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे.

९. प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व सादरीकरण करणे (जसे देशभक्तीपर गाणी,

नाटक आणि नृत्य)

१०. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरिता संविधान संमेलनाचे आयोजन करावे. त्यानुसार संदर्भाधीन पत्रामधील निर्देशांचे पालन होईल याबाबत दक्ष रहावे.

सहपत्र – वरीलप्रमाणे

Related posts:

Leave a Comment