फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२वी) विद्यार्थ्यांचा अप्पर आयडी (APAAR ID) नोंदवून घेणेबाबत ssc hsc student apaar id 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२वी) विद्यार्थ्यांचा अप्पर आयडी (APAAR ID) नोंदवून घेणेबाबत ssc hsc student apaar id 

संदर्भ :- राज्य मंडळाचे पत्र क्र.रा.म. / गणकयंत्र/११२/४३२०, दिनांक. २७/११/२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेळी Digilocker मध्ये विद्यार्थ्याच्या गुणपत्रिका उपलब्ध करुन द्यावयाच्या आहेत. त्याकरीता विद्यार्थ्यांच्या (APAAR ID) ची नोंद आवश्यक आहे. (APAAR ID) व्दारे प्राप्त Digital गुणपत्रिकांचे विद्यार्थ्यांना होणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत.

१. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचे कायमस्वरुपी Digital Record तयार होऊन सर्व शैक्षणिक गुणपत्रिका एकत्रित उपलब्ध होतात.

२. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशप्रक्रिया सुलभ होते. शैक्षणिक संस्था / नियोक्ते त्वरीत पात्रता पडताळणी करु शकतात. भौतिक कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाहींशी होते.

३. सरकारी शिष्यवृत्ती व योजनांमध्ये लाभ मिळणे सुलभ होतात.

४. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी कोठूनही उपलब्ध होतात.

५. केंद्रीकृत आणि सुरक्षित प्रणालीमुळे कागदपत्रे हरवण्याचा धोका नाही.

त्यामुळे आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा (APAAR ID) उपलब्ध करुन त्याची नोंद मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सुविधांचा लाभ होईल.

Related posts:

Leave a Comment