सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता ओपन जीम साहित्य व क्रिडा साहित्य खरेदी करण्याबाबत nivasi shala jim sahitya
शासन शुद्धीपत्रक-
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थ्यांना व्यायामासाठी ओपन जीम साहित्य व क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय, दिनांक १ डिसेंबर, २०१६ अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार ई-निविदा प्रक्रिया राबवून एकूण रक्कम रु.५३,७०,६१,७३८/- (अक्षरी रक्कम रुपये त्रेपन्न कोटी सत्तर लाख एकसष्ठ हजार सातशे अडतीस फक्त) इतक्या रक्कमेच्या खरेदीस संदर्भाधीन शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिली आहे.
२. संदर्भाधीन शासन निर्णयातील अ. क्र. ५ मधील तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
ई-निविदा असल्याने निविदाकारांनी एकच किंमत सांगणे अपेक्षित आहे. सदर किंमतीमध्येच SURVEY, DESIGN, FABRICATION, SUPPLY (incl. transportation), INSTALLATION, INCLUDES A ONE YEAR DEFECT LIABILITY PERIOED FOR THE SUPPLIED EQUIPMENT (ONE YEAR WARRANTY) व GST इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल, निविदाकार ई-निविदेमध्ये वरील बाबीसाठी वेगवेगळ्या किंमती दर्शविणार असल्यास संबंधित निविदा विचारात घेतले जाणार नाही”
३. तसेच संदर्भाधीन शासन निर्णयातील अ.क्र. ४ चा तक्ता (शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना लागणाऱ्या क्रीडा साहित्याचा तपशील) यामधील अ.क्र. २० मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती प्रस्तावित करण्यात येत आहे.
४. शासन निर्णयातील अन्य तरतुदी कायम राहतील.
५. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेताक २०२५१२३०१६५२५१९१२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने









