अंशतः अनुदानित तुकडीवरुन १०० टक्के अनुदानित पदावर बदलीबाबत anshatha anudanit paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंशतः अनुदानित तुकडीवरुन १०० टक्के अनुदानित पदावर बदलीबाबत anshatha anudanit paripatrak 

संदर्भ :- १. शासन अद्यादेश दि. १३/११/२०२५.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, गुरुवार, नोव्हेंबर १३. २०२५, अधिसूचना, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), विनियमन अधिनियम, १९७७ नुसार, क्रमांक संकीर्ण-२०२४/ प्र.क्र.३३५/टिएनटि-१. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ (१९७८ चा महा. ३) च्या कलम १६ ची पोट-कलमे (१) व (२) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शतों) नियमावली, १९८१ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे. हे नियम उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (३) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

१. या नियमांस, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) (सुधारणा) नियम, २०२५ असे संवोधण्यात यावे.

२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली, १९८१ च्या नियम ४१ अ च्या पोट-नियम (१) मधील खंड (ह) मधील “प्रकरणपरत्वे शिक्षणाधिकारी किंवा उप संचालक”, या मजकूराऐवजी “आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे” असे शब्द व कंस समाविष्ट करण्यात येईल, असा उल्लेख केलेला आहे.

सबब अंशतः अनुदानित तुकडीवरुन १०० टक्के अनुदानित पदावर बदलीबाबतचे अधिकार शासन अद्यादेश दि. १३/११/२०२५ नुसार शिक्षणाधिकारी किंवा उप संचालक ऐवजी मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना दिलेले आहेत. याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment