शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत shasan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत shasan paripatrak 

शासन परिपत्रक :-

शासकीय कर्तव्ये पार पाडीत असताना शासकीय कर्मचाऱ्याकडून घडलेल्या अपराध, गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजिले जाते, तेव्हा अशी शिस्तभंगविषयक कार्यवाही करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निदेशित करणे अत्यावश्यक आहे. याकरिता, सर्व प्रशासकीय विभागांना त्यांचे नियंत्रणाखालील शिस्तभंगविषयक प्राधिकारी घोषित करण्याबाबत दि.०७.०४.२०२५ रोजीच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ७ अनुसार, शासकीय कर्मचाऱ्याला नियम ५ मध्ये नमूद केलेली कोणतीही शिक्षा करण्याचा अधिकार असलेला शिस्तभंगविषयक प्राधिकारी हा विभागीय चौकशी सुरु करण्यास सक्षम प्राधिकारी आहे.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ च्या नियम ६ अनुसार किरकोळ शिक्षांचे अधिकार कोणास राहतील याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार,

४. काहीवेळा कर्मचाऱ्याने केलेली अनियमिततेचे स्वरुप फारसे गंभीर नसल्याचे निदर्शनास येते अशावेळी अशा कर्मचाऱ्यास किरकोळ शिक्षा देय ठरते. अपचाऱ्यास वेळीच शिक्षा होऊन कार्यालयामध्ये शिस्त राहणे आवश्यक आहे. अन्यथा विभागीय चौकशीच्या कार्यवाहीस विलंब झाल्यास व त्यानुषंगाने शिक्षेस विलंब झाल्यास, अन्य कर्मचाऱ्यांमध्ये चुकीचा समज पसरती. यास्तव, अशा अधिकारी/ कर्मचाऱ्यांविरुध्दची विभागीय चौकशीबाबतची कार्यवाही सुरु करण्यास व चौकशीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

१) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे किरकोळ शिक्षेस मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात यावेत,

२) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ७ अनुसार शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यास विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करता येईल.

३) परि.३ मध्ये नमूद केल्यानुसार किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित केल्यानंतर सदर अधिकान्याच्या लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याकडे अपीलाबाबतचे अधिकार सोपविण्यात यावेत.

४) उपरोक्त तरतूदी लक्षात घेवून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या

प्रकरणी किरकोळ शिक्षा, जबर शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी व अपीलीय प्राधिकारी घोषित करावेत.

५. सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी/ कर्मचारी यांचेकरिता शिस्तभंगविषयक प्राधिकारी कोण राहतील याबाबतचे आदेश निर्गमित करताना उपरोक्त सूचनांचे पालन करावे. त्यानुसार, आवश्यक ते आदेश तात्काळ निर्गमित करावेत व ते शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावेत. शिस्तभंग विषयक प्रकरण सादर करतेवेळी सदर आदेशान्वये घोषित केलेले शिस्तभंग विषयक प्राधिकारी नमूद करुनच प्रकरण सादर करणे अनिवार्य करण्यात येत आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०८२५१२३८१६१९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित

Related posts:

Leave a Comment