संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येणा-या थकीत देयकाबाबत thakit vetan deyak
संदर्भ- शासन निर्णय क्र. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकिर्ण २४१५/(३४/१५ अर्थसंकल्प दि.१५/०७/२०१७
विषयांकित प्रकरणी संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित थकित देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. मुख्याध्यापक, अधीक्षक वेतन पथक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक, व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पुर्ण तपासणी करून ती देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करून सदर देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर होणे आवश्यक आहे.
संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित थकित देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करतांना लाभार्थी कर्मचा-याची वैयक्तीक मान्यतेची खात्री तसेच ज्या कालावधीतील त्याचे देयक आहे त्या कालावधीत सदर व्यक्तीने खरोखच त्या शाळेत/सैनिकी शाळेत / उच्च माध्यमिक शाळेत काम केले होते, त्याची मान्यता बँक डेटेड केलेली नाही याची खातरजमा करूनच देयक पुढे पाठविण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
जर थकित देयकातील लाभार्थी कर्मचा-याची एसआयटी तपासणी मान्यता चूकीची निघाली तर देयके सादर करणा-या संबधित लाभार्थी कर्मचारी, मुख्याध्यापक, कर्मचारी, अधिकारी यांचे वर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश या पत्रानुसार देण्यात येत आहेत.
प्रत्येक प्रलंबित / थकित देयकाची मान्यतेची खात्री डिजीटेशन मध्ये असणा-या दस्तावेजानुसार करावी त्यांच्या मान्यतेचे मुळ दस्तवेज कार्यालयात आहे का, या बाबत खात्री करूनच देयके मान्यतेसाठी सादर करण्यात यावी.











