अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजीत करणेबाबत abhijat marathi bhasha saptaha
संदर्भ:- जा.क्र. राशैसंप्रपमपु/मराठी भाषा वि./अभिजात मराठी भाषा सप्ताह/ २०२५-२६/दि.१.१०.२५
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त शासन परिपत्रकानुसार दि.०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा व दि.०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरुन निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुषंगाने अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये जिल्हा, तालुका, ग्राम, व नगरस्तरीय उपक्रम सोबत दिलेल्या संदर्भिय पत्रात दिलेले आहे.
उपरोक्त विषयानुसार आपल्या अधिनस्त शाळांमध्ये सदर उपक्रमांची अंमलबजावणी करणेबाबत आदेशित करावे. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास पाठविण्यात यावा.
अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह आयोजित करणेबाबत… संदर्भ: मराठी भाषा विभाग- शासन परिपत्रक क्र. अभिजा २०२५/प्र. क्र. ५३/भाषा १ दि.२१/०७/२०२५
उपरोका संदर्भीय शासन परिपत्रकानुसार दि.०३ ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” व दि. ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत “अभिजात मराठी भाषा राप्ताह” प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना शासनस्तरावरून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
त्यानुषंगाने अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये जिल्हा, तालुका, ग्राम व नगरस्तरीय उपक्रम खालीलप्रमाणे आहेत
राऊळ मॅडम पत्रव्यवहार
१. राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये / महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी उद्योग, आस्थापना व राब, व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था / विद्यापीठे / महाविद्यालये इ. सर्व संस्थांमधून अभिजात मराठी भाषेसंदर्भातील जास्तीत जास्त संशोधन, संवर्धन व जनजागृती व्हावी या हेतूने प्रतिवर्षी दि. ०३ ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस व दि. ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत “अभिजात मराठी भाषा सप्ताह” म्हणून साजरा करण्यात यावा.
२. अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, शिचिरे आयोजित करण्यात यावीत.
३. अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने ग्रंथाची प्रदर्शने आयोजित करावीत. ताम्रपट / शिलालेखांच्या प्रदर्शनांचे आयोजन करून विद्यार्थी, सामान्य जनतेस मराठी भाषेतील अभिजात ग्रंथ परंपरेची ओळख करून द्यावी.
४. अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने प्राचीन ग्रंथ संपदेचे समकालीन मराठी मध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री करण्यात यावी.











