अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत anganvadi mandhan
शासन निर्णय :-
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.
२. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर, २०२५ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक-१ मधील प्रधान लेखाशीर्ष / उपशीर्ष / उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक २ मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक ४ मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये १७८.७२ कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्याचा आवश्यक निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
३. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दि. ७.४.२०२५ मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पध्दतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी.
४. सदर शासन निर्णय नियोजन विमानाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक २२३/का.१४७२, दिनाक १६.०६.२०२५ तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक २०५/व्यय-६. दिनाक ०७.०७.२०२५ अन्ाये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५१९२६१५३९४५८०३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,









