प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्व साधारण घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य शासनाचा अतिरीक्त निधी वितरणाबाबत (सन २०२५-२६) pm poshan mid day meal 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्व साधारण घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य शासनाचा अतिरीक्त निधी वितरणाबाबत (सन २०२५-२६) pm poshan mid day meal 

प्रस्तावना :

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर केंद्र हिस्स्याच्या निधीमधील दुसऱ्या हप्त्याचा रु.२६२७२.६७ लक्ष इतका निधी संदर्भाधिन दि.१० नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनास उपलब्ध करुन दिला आहे. सदर निधीची विगतवारी सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या घटकांतर्गत केली आहे. प्रस्तुत योजनेकरीता केंद्र व राज्य हिस्स्याच्या खर्चाचे प्रमाण ६०:४० आहे. उपरोक्त केंद्र हिस्स्याच्या निधीपैकी सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्स्याचा ६० टक्के प्रमाणे रु.१६६८२.६१ लक्ष इतका निधी आहे (स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या रु. २५००/- प्रतिमाह मानधनामध्ये रु.६००/- केंद्र हिस्साचा समावेश आहे.) त्यास समरुप राज्य हिस्याचा ४० टक्के प्रमाणे रु. १११२१.७४ लक्ष (स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या रु.२५००/- प्रतिमाह मानधनामध्ये रु.४००/- राज्य हिस्सा समावेश आहे.) असा एकूण रु. २७८०४.३५ लक्ष इतका निधी दि.१२.११.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरीत केला आहे.

उपरोक्त शासन निर्णयान्वये स्वयपाकी तथा मदतनीस याच्या रु.२५००/- प्रतिमाह मानधनामध्ये रु.६००/- केंद्र हिस्सा व रु.४००/- राज्य हिस्सा असा एकूण रु.६००+४००=१०००/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनामध्ये राज्य हिस्यातून अतिरिक्त रु.१५००/- याप्रमाणे वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून सर्वसाधारण घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य हिस्यातून अतिरिक्त रु.१५००/- याप्रमाणे रु. ४४,५५,७६,००० (रुपये चौव्वेचाळीस कोटी पंचावन्न लक्ष शहात्तर हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय वित्त विभाग यांचा अनौपचारीक संदर्भ क्र.अनीस ११०३/व्यय-५. दिनांक १७.११.२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. शालेय शिक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २३२५/(७०/२५)/अर्थसंकल्प, दि.१७.१०.२०२५ अन्वये शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरिता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

४. सदर निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवळी दिलेले निर्देश / आदेश / शासन निर्णय / परिपत्रक / सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ) महाराष्ट्र

राज्य, पुणे यांनी घेण्यात यावी. तसेच, सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

५. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५११२६१७१७२५४१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन निर्णय pdf download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment