एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी “भाऊबीज भेट” रक्कम मंजूर करणेबाबत anganvadi sevika madatnis mandhan rakkam manjur

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी “भाऊबीज भेट” रक्कम मंजूर करणेबाबत anganvadi sevika madatnis mandhan rakkam manjur 

वाचा :-

१) महिला व बाल विकास विभाग, शा.नि.क्र. एबादि-२०१७/प्र.क्र.१०३/का.६, दि. २३ फेब्रुवारी २०१८

२) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचे पत्र क्र. एबाविसेयो/अं. वाडी-भाऊबीज भेट/२०२५-२६/४३७१, दिनांक २१.०८.२०२५

प्रस्तावना:

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी रु.२,०००/ प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचा-यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रत्येकी रु.२,०००/- प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजूरी देत आहे.

२. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज मेट अदा करण्याकरिता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मागणी क्रमांक एक्स-१, २२३६. पोषण आहार, (०८) (०६) एकात्मिक बाल विकास सेवा योजना, (भाऊबीज भेट) (अतिरिक्त राज्य हिस्सा १००%) (२२३६१९५४). ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधुन आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्र.०२ येथील पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार रुपये ४०.६१३० कोटी (अक्षरी रुपये चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार फक्त) इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासन निर्णय क्रमांका एबावि-२०२५/प्र.क्र.१६४/का.६

3. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी.

४. हा शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. २८४/का. १४७२ दिनांक २६.०८.२०२५ व वित्त विभागाने अनौपचारीक संदर्भ क. २६४/व्यय-६, दिनांक १२.०९.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202509251112461530 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Related posts:

Leave a Comment