महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ खंड-२मधील परिशिष्ट १२ सोबतच्या जोडपत्रान्वये विहित करण्यात आलेल्या अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा करणेबाबत antim vetan pramanpatra 

महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ खंड-२मधील परिशिष्ट १२ सोबतच्या जोडपत्रान्वये विहित करण्यात आलेल्या अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा करणेबाबत antim vetan pramanpatra 

शासन निर्णय येथे पहा pdf download 

वाचा :

१) महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ खंड २ मधील परिशिष्ट-१२

२) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. मातंसं/नस्ती ०७/प्र.क्र.४८/का-३९. दि. २५.०६.२००७.

३) महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण १०११/सं.क्र.१७/कोषा.प्रशा.५, दि.१६.०७.२०११.

४) महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०११/सं.क्र.१७/कोषा.प्रशा.५. दि.१५.१०.२०१३.

प्रस्तावना:-

(अ) राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची वेतन देयके तयार करण्यासाठी व अधिकारी /कर्मचारी यांचा सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरुपात उपलब्ध करण्यासाठी सेवार्थ ही शासनाची अधिकृत आज्ञावली उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक २ समोर नमूद शासन निर्णयान्वये अंमलात आणण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्व राज्य शासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या मासिक वेतनाची देयके सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून तयार करण्यात येत

आहेत.

(आ) महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ खंड २ मधील परिशिष्ट १२ अन्वये अंतिम वेतन प्रमाणपत्र तयार करण्याबाबत नियमन करणारे नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर परिशिष्टासोबतच्या जोडपत्रान्वये अंतिम वेतन प्रमाणपत्राचा नमुना देखील विहित करण्यात आलेला आहे. दरम्यानच्या काळात अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये संबंधित अधिकारी /कर्मचाऱ्याच्या नैमित्तिक रजा, कर्मचाऱ्याने परत न केलेली प्रकाशने व जड संग्रह वस्तू इत्यादी बाबतची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक ३ समोर नमूद शासन निर्णयान्वये अंतिम वेतन प्रमाणपत्राचा नमुना सुधारित करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

(इ) तद्नंतर सेवार्थ प्रणालीमध्ये अंतिम वेतन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून, या संदर्भातील सविस्तर कार्यपध्दती उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक ४समोर नमूद शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे.

(ई) राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींसंदर्भात कार्यवाहीच्या प्रक्रियेचे स्वयंचलन (Automation) करण्याकरीता सामान्य प्रशासन विभागामार्फत “नियुक्ती ते सेवानिवृत्ती ऑनलाईन सेवा प्रणाली” हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये सुधारणा करणे क्रमप्राप्त झालेले आहे.

(उ) सध्या सेवार्थ प्रणालीद्वारे संस्करित होत असलेल्या अंतिम वेतन प्रमाणपत्रामध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याला देण्यात आलेली वेतनवाढ देय असलेली पुढील वेतनवाढ, ना विभागीय चौकशी व ना मागणी प्रमाणपत्राच्या अंतर्गत आवश्यक असलेली माहिती, वसूली असल्यास वसूलीचा तपशील, शासकीय कामासाठी घेतलेली परंतु समायोजित न केलेली अग्रिमाची रक्कम तसेच प्रदानाच्या तपशीलामध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याची अधिकची माहिती, या बाबी समाविष्ट नाहीत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या “नियुक्ती ते सेवानिवृत्ती ऑनलाईन सेवा प्रणाली” या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये समुचित सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

शासन निर्णय :

१. उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक ३ समोर नमूद शासन निर्णय याद्वारे दि.१ ऑगस्ट, २०२५ पासून अधिक्रमित करण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ खंड २ मधील परिशिष्ट १२ सोबतच्या जोडपत्रान्वये विहित करण्यात आलेला अंतिम वेतन प्रमाणपत्राचा नमुना या शासन निर्णयाद्वारे सुधारित करण्यात येत असून, तो या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र “अ” प्रमाणे असेल. सदर सुधारित नमुना दि.१ ऑगस्ट, २०२५ पासून अंमलात येईल.

३. अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या सुधारित नमुन्यामध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याला देण्यात आलेली वेतनवाढ, देय असलेली पुढील वेतनवाढ, ना विभागीय चौकशी व ना मागणी प्रमाणपत्राच्या अंतर्गत आवश्यक असलेली माहिती, वसूली असल्यास वसूलीचा तक्ता, शासकीय कामासाठी घेतलेली परंतु समायोजित न केलेली अग्रिमाची रक्क्म तसेच प्रदानाच्या तपशीलामध्ये संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याची अधिकची माहिती, या बाबी समाविष्ट असतील.

४. सेवार्थ प्रणालीतून अंतिम वेतन प्रमाणपत्र संस्करित करण्यासाठी तसेच नियमोचित अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रणालीद्वारे प्रत्यक्ष तयार (Generate) होण्यासाठी, कार्यालयाच्या लेखा शाखेच्या सोबतच आस्थापना / प्रशासन शाखेतील संबंधित अधिकारी / कर्मचारी सुद्धा जबाबदार असणार आहेत. ज्या बाबी (जसे ना विभागीय चौकशी व ना मागणी प्रमाणपत्र, जडसंग्रहाचा तपशील, रजेचा तपशील इत्यादी) आस्थापना / प्रशासन शाखेशी निगडीत आहेत, त्या बाबींकरीता आस्थापना / प्रशासन अधिकाऱ्यांनी अचूक व अद्ययावत माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदविणे अनिवार्य राहील.

4. अंतिम वेतन प्रमाणप्रत्राच्या नमुन्यामध्ये करण्यात आलेल्या सदर सुधारणेच्या अनुषंगाने सेवार्थ प्रणालीमध्ये समुचित विकसन करुन घेण्यास संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व संबंधित वापरकर्त्यांसाठी समुचित मार्गदर्शक पुस्तिका (User Manual) तयार करुन ते सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही देखील संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र यांनी करावी.

६. सेवार्थ प्रणालीमधून अंतिम वेतन प्रमाणपत्र तयार करण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपध्दती उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक ४ समोर नमूद शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली असून ती यापुढील काळात देखील अनुसरण्यात येईल.

७, प्रस्तुत शासन निर्णयास अनुसरुन महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मध्ये समुचित सुधारणा यथावकाश करण्यात येतील.

८. प्रस्तुत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांनी त्यांच्या अनौपचारीक संदर्भ क्र. १५/२०२५, दि.२३ जून २०२५ तसेच महालेखापाल१ (ले. व अ.) महाराष्ट्र, मुंबई यांनी त्यांच्या खवि/चा-१/वित्त विभाग/युओआर७२/२०२५-२६/५२५, दि. १० जुलै, २०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन त्यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०७२५१७३६००२२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय येथे पहा pdf download 

Leave a Comment