सन २०२५-२६ चे अनुदान वितरण anudan vitran paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ चे अनुदान वितरण anudan vitran paripatrak 

जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदानं,

सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील माहे फेब्रुवारी, २०२६ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्रार्थामक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.

उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.

अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.

आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात निर्यामतपणे सादर करावा.

वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत.

टिप :- वितरीत केलेल्या तरतूदीमधून माहे फेब्रुवारी २०२६ चे नियमित वेतन, सेवानिवृत्तीवेतन, नियमानुसार देय महागाई भत्ता फरक, वैद्यकीय देयके, लोक आयुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे व नियमोचित थकित देयके यथानियम अदा करावीत. लेखाशिर्ष २२०२०१७३-०४ मध्ये नियमित सेवानिवृत्तीवेतन व सेवाज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त कर्मचा-यांचे अंशराशीकरण व उपदान अदा करण्यात यावे.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment