फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत ssc and hsc exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत ssc and hsc exam

संदर्भ- १. जा.क. रा.सं./ परीक्षा ६/३६९७, दि.३१/१०/२०२५

२. जा.क. रा.मं./परीक्षा ६/३९४६, दि.१७/११/२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) लेखी व अन्य परीक्षा खाली नमूद केलेल्या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षेच्या परीक्षापूर्व, परीक्षेच्या दरम्यान व परीक्षोत्तर करावयाच्या विविध कामाचा तपशील खालीलप्रमाणे.

१. या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे निर्धारित मुदतीत घेऊन नियमानुसार कोणताही पात्र विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आपल्या स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

परिपत्रक pdf download

२. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर विद्युत जोडणी, पंखे, दिवे व इतर भौतिक सुविधा असणे आवश्यक असून, परीक्षा कालावधीत अखंडित विद्युत पुरवठा राहण्यासाठी जनरेटर/इन्व्हर्टर सुविधा असणे आवश्यक आहे याबाबत दक्षता घेण्यात यावी. सदर बाब परीक्षा केंद्र संचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी व त्यानुसार मा. न्यायालयाचे व शासनाचे आदेशाचा अवमान होणार नाही असे पहावे.

३. सदर परीक्षा कालावधीत विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्षाची सुविधा निर्माण करण्यात यावी. सदर नियंत्रण कक्ष सकाळी ९.०० ते सायं. ७.०० पर्यंत कार्यरत राहील याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेब परीक्षा नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी

४. परीक्षा सुरु झाल्यावर पहिल्या दिवशीच परीक्षा संचालनाचा अहवाल ई-मेलव्दारे राज्य मंडळाकडे पाठवावा. परीक्षा कालावधी राजपत्रित अधिकाऱ्याऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. निकडीच्या कामासाठी मुख्यालय सोडावयाचे झाल्यास मा. अध्यक्ष, राज्य मंडळ यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

५. परीक्षा नियंत्रण कक्षामध्ये वरिष्ठ अधीक्षक, शाखाप्रमुख, लिपिक, टेलिफोन ऑपरेटर, स्टेनो टायपिस्ट इ. व इतर आवश्यक कर्मचारी यांचा आवश्यकतेनुसार समावेश करावा. जेणेकरुन परीक्षेच्या कामात अडचण निर्माण होणार नाही.

६. विभागीय मंडळ कार्यालयाचा E-Mail व्यवस्थित कार्यान्वित राहील याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी.

७. परीक्षा केंद्रावर आकस्मिक घटना घडली तर प्रथम बेट मा. अध्यक्ष, सचिव, राज्यमंडळ, यांना तपशीलवार माहितीसह भ्रमणध्वनीव्दारे व ई-मेल व्दारेही अवगत करुन देणे व परिस्थितीनुसार योग्य ती कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सोबतच्या तक्त्यात राज्य मंडळ कार्यालयास सादर करावा.

८. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक, प्राथमिक, योजना) मा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय व निवासाचे दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक, जिल्हास्तरावर अधिकचा संपर्क साधण्यासाठी आणखी एका जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांचा अद्ययावत ई-मेल आयडी विभागीय मंडळ स्तरावर अद्ययावत स्वरुपात ठेवण्यात यावेत.

९. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्तही परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणी सोडवता याव्यात यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सकाळी ८.०० ते सायं. ८.०० पर्यंत हेल्पलाईन सुरु ठेवण्यात यावी. सदरची हेल्पलाईन लेखी परीक्षेच्या आठ दिवस अगोदर कार्यान्वित करावी सदर हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले सहसचिव, सहा सचिव, शाखाधिकारी, शाखाप्रमुख, कर्मचारी व समुपदेशक यांचे भ्रमणध्वनी कमांकासह यादी व त्याबाबतचे प्रकटन विभागीय मंडळ स्तरावर प्रसिध्द करुन त्याची प्रत राज्य मंडळ कार्यालयास सादर करावी हेल्पलाईन नियमित सुरु राहील याची दक्षता घ्यावी.

परिपत्रक pdf download

१०. विभागीय मंडळ कक्षेतील परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्र संचालकांची सभा जानेवारी २०२६ मध्ये आयोजित करुन परीक्षा कामकाजासंदर्भात सभेमध्ये सविस्तर सूचना देण्यात याव्यात. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना करणेबाबतही सदर बैठकीत सूचना दयाव्यात.

परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment