अनुदानित शाळेच्या माहे मार्च एप्रिल २०२६ च्या वेतन संबंधित यंणाऱ्या अडचणी बाबत anudanit shala vetan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुदानित शाळेच्या माहे मार्च एप्रिल २०२६ च्या वेतन संबंधित यंणाऱ्या अडचणी बाबत anudanit shala vetan 

संदर्भः- १) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.१६.०७.२०२५/१३२८५३२

२) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी. दि.२२.०१.२०२६०/१६८५२९६

३) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६वी. दि.०४.०३.२०२६/१७५७८५७

४) संचालनालयाचे पत्र.क. शिरांमा/दि.२५-२६/टि-६वी. दि.०५.०३.२०२६./१६८५२९६

५) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६वी.दि. २७.०३.२०२६./१८१३४८०.

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने माहे मार्च एप्रिल २०२६ च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) शाळेमधील प्रत्यक्ष संचमान्यते नुसार मान्य पदे व कार्यरत पदे यामध्ये कार्यरत पदे मंजूर संचमान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्रार्थामक/माध्यमिक शाळांच्या बाबतीत एकस्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी तपासणी करून त्यांचे login मधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाचत कार्यवाही करावी. तसेच उच्च माध्यमिक शाळांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्या login मधून उपरोक्त प्रक्रिया पार पाडावी. माहे मार्च एप्रिल २०२६ च्या वेतना करीता शालार्थ प्रणालीवर हो सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे हयापुढे सदर सुविधा उपलब्ध असणार नाही.

२) ज्या शाळांच्या बाबत एक युडायस क्रमांक दोन शाळांना देण्यात आलेला आहे, अशा परिस्थितीत आवश्यक ती दुरुस्ती मुख्याध्यापक तथा DDO-1 व अधिक्षक (वेतन पथक) तथा D.D.O-2 यांच्या login मधून संबंधित U-Dise क्रमांकाचे अद्यावतीकरण करण्यात यावे. तसेच एका U-Dise क्रमांकावर दोन शाळांचे D.D.O-कोड तयार झाले असल्यास एक D.D.O-कोड अधिक्षक वेतन पथक यांच्या login मधून अकार्यान्वित करण्यात यावा.

EDICOM-1140T-7/24/2026-DIRSEC-Budget-Panning

1/1861857/2004

३) शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडसर येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.

उपसंचालक यांनी प्रथम नियक्ती दिनांक व जन्म दिनांक याचाबतची पडताळणी करुन कागदपत्रांच्या आधारे प्रथम नियक्ती दिनांक जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करावा.. अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करावा, तसेच संबंधितांना आदेशासह कळवावे.

उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करुन माहे मार्च/एप्रिल २०२६ मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment