इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ eleventh online admission
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थ्यांकरीता प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पासून सुरु करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग-१ भरुन नोंदणी करु शकतात. प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा निकाल जाहिर झाल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात येईल.
विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.










