राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते gat vima yojana 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते gat vima yojana 

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते…. दि.०१ जानेवारी, २०२६ ते दि.३१ डिसेंबर, २०२६ या कालावधीकरिता.

प्रस्तावना :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता संदर्भाधीन क्र.६च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आला होता. त्याप्रमाणेच राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत माहे जानेवारी, २०२६ ते माहे डिसेंबर, २०२६ या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणतीय तक्ता निर्गमित करणे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय :-

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२६ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२६ या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्ता सोबत जोडला आहे. सदर तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी.

२. मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी दिनांक १ जानेवारी, २०२६ पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना/कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी.

३. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-१९८२ च्या परिच्छेद ८.४ अन्वये बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दरसाल विहित दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या बचत निधीमधील संचित

रकमांवर दि.०१ जानेवारी, २०२६ पासून दर साल दर शेकडा ७.१ टक्के दराने (तिमाही चक्रवाढ होणारे) व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा ४ टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी.

४. सोबतचा परिगणितीय तक्ता संचालक, लेखा व कोषागारे संचालनालयाचे पत्र क्र.संलेको/गवियो/२०२६/परिगणतीय तक्ते/०४/०३/४८७, दिनांक २७ जानेवारी, २०२६ अन्वये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या परिगणनेनुसार निर्गमित केला आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०२०२११४४३८८३०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Related posts:

Leave a Comment