१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषा उपक्रम independence day prashnamanjusha
नमस्कार आज आपण आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिना विषयी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे यामध्ये खालील प्रमाणे प्रश्न विचारण्यात आली.
१.आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले?
उत्तर आहे 15 ऑगस्ट 1947
२. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांची नावे सांगा?
उत्तर – महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग राजगुरू सुखदेव
३. आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर :- पंडित जवाहरलाल नेहरू
४. आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर – डॉक्टर राजेंद्र प्रसाद
५. भारताचे संविधान लिहिण्याचे पवित्र कार्य कोणी केले?
उत्तर – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

६. भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते?
उत्तर – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
७. भारताच्या संविधानाच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर – डॉक्टर राजेंद्र प्रसाद
८. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

