“आंतरराष्ट्रीय योगदिन” सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत international yoga day celebration jagtik yoga divas

“आंतरराष्ट्रीय योगदिन” सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत international yoga day celebration jagtik yoga divas 

दिनांक २१ जून, २०१६.

१) शासन परिपत्रक क्रमांकः उपक्रम-२३१५/प्र.क्र.१४५/एसडी-४, दिनांक १७ जून, २०१५.

२) सचिव, आयुर्वेद योग व प्राकृतिक चिकित्सा, युनानी, सिध्द एवं होमियोपथी (आयुष) मंत्रालय, नवी दिल्ली यांचे क्र. डीओ नं. एस-११०१२/६/२०१६-आयइसी, दिनांक २९.०३.२०१६ चे पत्र.

३) सह सचिव, आयुर्वेद योग व प्राकृतिक चिकित्सा, युनानी, सिध्द एवं होमियोपथी (आयुष) मंत्रालय, नवी दिल्ली यांचे क्र. डीओ नं. एस-११०१२/३४/२०१६-आयइसी, दिनांक २४.०५.२०१६ चे पत्र.

४) मा. पंतप्रधानांनी मा. मुख्यमंत्री महोदयांना पाठविलेले दि.१.०६.२०१६ चे पत्र.

शासन परिपत्रक :

संयुक्त राष्ट्रसंघाने “२१ जून” हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केलेला आहे. ५००० वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारिरीक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यिभूत आहे. दुसऱ्या जागतिक योगा दिनाचे आयोजन दि.२१.०६.२०१६ रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील युवा वर्ग तसेच सर्व सामान्य व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेऊन करावयाचे आहे. या संदर्भात योगा उत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम इ. चे आयोजन शाळा, महाविद्यालये, विद्यापिठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एन.एस.एस., नेहरु युवा केंद्र इ. युवा संघटनांमार्फत योगा संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भातील अन्य माहिती www.ayush.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

२. उपरोक्त आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे, योगादिन आयोजनाबाबत मार्गदर्शन करणे इ. साठी १) कैवल्यधाम, लोणावळा, पुणे २) दि योगा इस्टिट्यूट, सांताक्रूझ, मुंबई ३) रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इस्टिट्यूट, पुणे या तीन प्रतिथयश योग संस्थांनी सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शाळांमध्ये

योगदिन साजरा करण्याबाबतच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत सर्व क्षेत्रिय कार्यालयांना याद्वारे देण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शाळांसोबतच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक २१ जून, २०१६ रोजी योगदिन साजरा करण्यात येणार येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात यावा.

३. उपरोक्त संदर्भात स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या साहित्यामधून योगासाठी लागणाऱ्या मॅटस् व अन्य साधनांचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच योग विषयक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विकलांग / दिव्यांग व्यक्तींचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही करण्यात यावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०६१०१२४८३५६३२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Leave a Comment