सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत एकल माता असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करून घेणेबाबत krantijoti savitribai fule balsangopan yojana 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत एकल माता असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करून घेणेबाबत krantijoti savitribai fule balsangopan yojana 

संदर्भ :- १. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या कार्यालयाचे पत्र क्र. मंत्री / शालेय शिक्षण/जनरल /९१५४/२०२५, दि.१२.०९.२०२५.

२. शासन पत्र क्र. संकिर्ण-३८२५/प्र.क्र.१/एसडी-२, दि.१३.१०.२०२५

३. संचालनालयाने पत्र क्र. प्राशिसं/८०२/संकीर्ण/एकल/२०२५/१५९७४९१. दि.११/१२/२०२५

४. शासन पत्र क्र. संकिर्ण-२०२६/प्र.क्र.१८/एसडी-५, दि.०२.०३.२०२५

वरील विषयाबाबत संदर्भ क्र ४ च्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे कार्यालयाने संदर्भक्र. १ चे व संदर्भ क्र २ चे पत्रान्वये राज्यातील इ. १ ली ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या विधवा, घटस्फोटीत परित्यक्त्या माहिलांच्या मुलांची माहिती सादर करणेबाबत निर्देश प्राप्त झाले होते. विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून प्राप्त माहिती संदर्भ क्र.३ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेली आहे.

सदर प्रकरणी मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ फेब्रुवारी, २०२६ रोजी बैठकीत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत एकल माता असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांच्या लाभप्राप्तीबाबत आढावा घेण्यात आला. याबाबत शालेय शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार इ.१ ली ते १२ वीमध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या मुलांची संख्या २,२३,०४२ एवढी असल्याने पुढील प्रमाणे निर्देश संदर्भ क्र ४ च्या पत्रान्वये दिलेले आहेत.

१. विभागाने केलेल्या इ. १ ली ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या मुलांच्या सर्वेक्षणानुसार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरीता पात्र असूनही ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्याथ्यर्थ्यांकडून अर्ज सादर करून घेण्यासाठी संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करून अर्ज भरून घ्यावेत.

२. अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व सादरीकरण या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सक्रिय सहकार्य करावे. ३. भरलेले अर्ज महिला व बालविकास विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे नियमानुसार सादर करण्याची कार्यवाही करावी.

४. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाच्या वेळी एकल माता असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. सदर नोंदवहीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती नमूद करून ती अद्ययावत ठेवावी. संकलित माहिती महिला व बालविकास विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी/कर्मचा-यांना उपलब्ध करून द्यावी.

संदर्भ क्र ४ अन्वये प्राप्त निर्देशानुसार आपल्या कार्यकक्षेतील सर्व संबंधीत क्षेत्रिय कार्यालयास कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक सूचना देऊन प्राधान्याने कार्यवाही होईल असे पहावे.

योजेनेचा फायदा खालील बालकांना देता येईल :-

(अ) अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक देणे शक्य होत नाही, अशी बालके.

(ब) एक पालक असलेली व family Crisis मध्ये असलेली बालके, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे मृत्यू, घटस्फोट. इ. कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच. आय. व्ही. ग्रस्त /बाधित बालके, तीव्र मतिमंद / Multiple disability बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके..

(क) पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील (Crisis situation मधील) बालके.

(ड) शाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)

(३) शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांना गरजू मुलांची निवड करून, बालकल्याण समितीपुढे मुलांना हजर करणे आवश्यक राहील. बाल कल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या मुलांना बाल संगोपन योजनेंतर्गत अनुदान देण्यात येवू नये.

(४) बाल संगोपन योजनेसाठी बालकांची शिफारस राज्यातील दवाखाने / पोलीस स्टेशन / कारागृह, न्यायालय, कौटुंबिक हिसाचार कायद्याखालील संरक्षण अधिकारी, Service Provider] [Legal Service Aid Society हे सुध्दा करु शकतील. संबंधित स्वयंसेवी संस्था यांनी या शासकीय कार्यालयाशी सतत संपर्कात रहावे. या शासकीय कार्यालयामुळे एच. आय. व्ही. ग्रस्त बालक, शिक्षा/तुरुंगवास झालेले पालक यांची मुले यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळू शकेल. बालकल्याण समिती समोर मुलांना हजर करून, समितीच्या शिफारशीनुसार या योजनेचा फायदा स्वयंसेवी संस्थामार्फत देण्यात यावा. बालकल्याण समितीने संस्थेत प्रवेश देण्याची शिफारस करण्याऐवजी या बालसंगोपन योजनेखाली जास्तीत जास्त मुलांना लाभ द्यावा.

(५) बाल न्याय अधिनियमातील तरतूदीतील मुलांची व्याख्येनुसार ज्यांनी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेली नाहीत ती मुले म्हणजे बालक आहेत म्हणून बाल संगोपन योजना १८ वर्षापर्यतची (१८ वर्षेखालील) मुले यासाठी पात्र समजण्यात येतील. १८ वर्षांपेक्षा मोठया मुलांची मान्यता आपोआप रद्द होईल.

(६) लाभार्थ्यांच्या निवासी पुराव्याबाबत रेशन कार्डाव्यतिरिक्त निवासासंबंधीचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात यावेत. उदा. रेशनकार्ड / विजेचे देयक /पाण्याचे देयक / घरपट्टी / नगरपालिका दाखला /नगरसेवकाचा दाखला ग्राह्य धरावा.

(७) तहसिलदाराच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी उत्पन्नाचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात यावेत. उदा. वेतन चिठ्ठी (Slip), पालकांच्या कार्यालयाचा दाखला, पालक कोणते काम करतात याचा स्पष्ट उल्लेख असावा. याशिवाय लाभार्थ्यांच्या घराचा व कुटुंबाचा फोटोही संबंधित Case file मध्ये जोडण्यात यावा.

(८) या योजनेंर्तगत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना प्रकरणाची तपासणी करुन निधी वितरीत करण्याचे अधिकार राहतील. स्वयंसेवी संस्थेने मुलांची Case file व आवश्यक records ठेवावे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना सदर records ची अचानक तपासणी करण्याचे पूर्ण अधिकार राहतील.

बालसंगोपन अर्जाला कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ?

याचा छापील अर्ज तालुका अंगणवाडी कार्यालयाच्या कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यावा

१) योजनेसाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज

२) पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स

३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट

४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.

५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला

६) पालकाचा रहिवासी दाखला.

(ग्रामपंचायत / नगरपालिका यांचा)

७) मुलांचे बॅक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक

८) मृत्यूचा अहवाल – (कोविडने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)

९) रेशनकार्ड झेरॉक्स.

१०) घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो)

१०) मुलांचे ३ पासपोर्ट फोटो

Related posts:

Leave a Comment