क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती- 2026 जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती- 2026 जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti

सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ,

चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे गुरुजन

आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो….

“आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी, झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी !

ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या तुम्ही ज्ञानज्योती, वंदन करतो मनोभावे तुम्हाला कोटी कोटी !!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आपल्या शाळेमध्ये आपण साजरी करत आहोत त्यानिमित्ताने ! त्यांना मनोभावे वंदन करून, मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानसंवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई ! देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा

डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई ! धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई !

मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतीय लोकांचा दृष्टिकोन अतिशय संकुचित होता. स्त्रियांना शिक्षण घेण्याची मनाई होती. स्त्रियांना समानतेची वागणूक नव्हती. चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र आहे, अशी लोकांची पक्की धारणा होती, अशा काळात 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्या तील नायगाव येथे लक्ष्मीबाई आणि खंडोजी निवसे पाटील यांना कन्याश्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी ‘सावित्री’ ठेवले आणि हीच सावित्री स्त्री शिक्षणाची उद्‌द्घगाती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून लौकिक पावली. अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्बल स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या ! महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे, स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते, हे सावित्रीबाईनी पुढील काळात महिलांचा स्त्री शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती.

याकरिता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी खूप संघर्ष केला. या कालबाह्य रुढीच्या बेड्या तोडण्याकरिता ज्योतिबा व सावित्रीबाईंनी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. स्त्रियांनी शिकणे व शिकवणे धर्म अनुसरून नाही, असे काही लोकांना वाटे, अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला. सावित्रीबाई शाळेत जायला निघाल्या की, हे विरोधक त्यांच्यावर दगड, शेण व चिखल फेकत, पण सावित्रीबाईंनी या सगळ्यांना खंबीरपणे तोंड दिले. सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाही, तर विधवांची परिस्थिती सुधारावी आणि बालहत्या थांबाव्यात, म्हणून त्यांनी आश्रम उभारले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुराही सावित्रीबाईनी यशस्वीरित्या सांभाळली.

स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या, दीन दलितांना मायेने जवळ घेणाऱ्या, अनाथांना आश्रय देणाऱ्या आणि ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा दिवा उभ्या देशात लावणाऱ्या सावित्रीबाईचा मृत्यू देखील समाजसेवेचे व्रत करत असतानाच झाला. मित्रांनो, 1897 साली पुण्यात महाभयंकर अशी प्लेगची साथ पसरली होती. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली.

अशातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत माळवली त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी केलेल्या महिला शिक्षणाच्या आणि

समाजसुधारणेच्या अनमोल कार्यामुळे त्या अनंत काळापर्यंत अजरामर झाल्या आहेत. शेवटी मी एवढेच म्हणेन की,

“स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती ! म्हणून तर आज जगती अजरामर आहे सावित्री !!”

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Related posts:

1 thought on “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती- 2026 जयंतीनिमित्त सोपे मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti”

Leave a Comment