राज्यातील सर्व शाळांचे “Maha School GIS” अॅपवर जिओ टॅगिंग करणेबाबत
संदर्भ : १. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) सोबत दि. ०४.०२.२०२५ रोजीचा करारनामा.
२. शासन परिपत्रक क्रमांक: ईगव्ह-२०२५/प्र.क्र.७/संगणक, दिनांक. २३ एप्रिल, २०२५
३. आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र. आशिका /२०२५/एमआरसेंक/ईगव्ह. १४३, दिनांक. ३०/०४/२०२५
विषयांकित प्रकरणी संदर्भ क्र. २ मधील शासन परिपत्रकान्वये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे (Geospatial Technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता Mobile App: “Maha School GIS” अॅप विकसित करण्यात आले आहे.
२/- सदर मोबाईल अॅप मध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लस मधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडायस प्लस मध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS Location (Latitude & Longitude with time stamp) Capture करुन शाळेचे नावासह फोटो, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे फोटो समाविष्ट करुन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो / माहिती अद्ययावत करावयाची आहे.
३/- या संदर्भात दि. १७.०४.२०२५ रोजीच्या व्हीसीद्वारे बैठकीमध्ये सर्व क्षेत्रिय कार्यालयांना अॅपच्या वापराबाबत डेमो व इतर सर्व आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या असून सर्व शाळांकडून दिनांक १९.०४.२०२५ पासून सदरची माहिती भरुन पाठविण्याबाबत सर्व क्षेत्रिय अधिका-यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
४/- तसेच संदर्भ क्र. ३ मधील पत्रान्वये राज्यातील सर्व शाळांचे मॅपिंग विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत,
५/- तरी सद्यस्थितीत राज्यातील १,०४,३६७ शाळांचे मॅपिंग पूर्ण झाले असून ३,७९८ शाळा अद्यापही अनमॅप आहेत. सदर अनमॅप शाळासंदर्भात क्षेत्रिय कार्यालयांना वेळोवेळी VC द्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही संबंधित शाळांनी मॅपिंग केलेली नसल्याचे निदर्शनात आले आहे. तरी संबंधितांनी सदर शाळांचे मॅपिंग का करण्यात आले नाही याबाबत पडताळणी करावी. तसेच सदर शाळा बंद असतील तर संबंधित EO नी याबाबतची माहिती UDISE मध्ये अद्ययावत करावी. परिणामी सदर शाळा अनमॅप डेटा मधून कमी होतील. उक्त शाळांचे मॅपिंग करण्यासाठी अन्य काही अडचणी येत असतील तर त्याचा आपल्या स्तरावर आढावा घेवून उर्वरित सर्व शाळांचे मॅपिंग पुढील १० दिवसात पूर्ण होईल याबाबत कार्यवाही करावी,
६/-School
Mapping चा जिल्हानिहाय मॅप व अनमॅप शाळांचा रिपोर्ट http://११५.१२४.१२५.६४/school mapping/summaryReport?action=summary-report लिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच अनमॅप शाळांचा सविस्तर अहवाल जिल्हा/तालुका/शाळानिहाय http://११५,१२४.१२५.६४/school_mapping/detailReport?action=detail-unmapped-report या लिकवर उपलब्ध आहे. त्यादृष्टीने सर्व शाळांचे मॅपिंग पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करावी.
७/- ज्या शाळा मॅप होणार नाहीत अश्या शाळांचा अहवाल सर्व शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा, मॅप न होणा-या शाळांचा एकत्रित अहवाल शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक यांनी शिक्षण आयुक्तालयास सादर करावा,










