MAHA-TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) -२०२५ maharashtra teacher eligibility exam

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHA-TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) -२०२५ maharashtra teacher eligibility exam

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी घेण्याचे नियोजित आहे.

सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी दि. १५/०९/२०२५ ते दि. ०३/१०/२०२५ पर्यंत होता. परंतु महाराष्ट्रात काही जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ०४/१०/२०२५ ते दि. ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

तसेच विद्यार्थी/उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे दि. ०९/१०/२०२५ रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सबब यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment