२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन भाषण marathi bhasha gaurav din 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन भाषण marathi bhasha gaurav din

प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी रोजी भारतात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिन असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक जण हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. हा दिवस फक्त भाषेची ओळख करून देण्यासाठी नाही, तर मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, साहित्य आणि संस्कृती कला यांचा गौरव करण्यासाठी आहे. तसेच आपल्या मातृभाषेचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा देखील हा दिवस आहे.

मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे जगभरात ८३ दशलक्षांहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात. ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे.

मराठी भाषेच्या ४२ बोली आहेत. त्यापैकी वैदर्भी, झाडी बोली, कोकणी आणि खान्देशी या बोली अधिक प्रचलित

आहेत. मराठी भाषेची वाक्यरचना आणि व्याकरण प्राकृत आणि पाली या प्राचीन भाषांवर आधारित आहे.

मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास

मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना ‘कुसुमाग्रज’ म्हणून ओळखले जाते, यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा जन्मदिवस, म्हणजेच २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर २०१४ साली पहिल्यांदा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला होता.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४७ अंतर्गत, ज्या भाषा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, त्यांना राष्ट्रपती राजभाषेचा दर्जा देऊ शकतात. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते एक प्रतिभावान कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार आणि समीक्षक होते. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याच्या सन्मानार्थ २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, ज्यामुळे मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा.

मराठी भाषेचे महत्त्व

भारत आणि इतर अनेक देशांमध्ये मराठी भाषेला आदर आणि महत्त्व आहे. हा दिवस मराठी साहित्याच्या सन्मानासाठी समर्पित आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांसह अनेक महान साहित्यिकांच्या लेखनाने मराठी भाषा समृद्ध आहे. देशातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी अग्रस्थानी आहे.

मराठी भाषा गौरव दिन याप्रमाणे साजरा केला जातो

२७ फेब्रुवारीला जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि काव्यवाचन अशा विविध स्पर्धांमध्ये मुले उत्साहाने सहभागी होतात. भारतात आणि विदेशात ही बऱ्याच ठिकाणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, पारंपरिक महाराष्ट्रीयन कपडे परिधान करून रॅली काढत, मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.

Related posts:

Leave a Comment