निरोप (समारंभ) समारोप मराठी भाषण nirop samarambha marathi bhashan
पुज्यनीय शारदामाता यांची प्रतिमा, आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष महोदय, माझ्या शाळेतील सर्व शिक्षक व माझे बालमित्र विद्यार्थी विद्यार्थिनी
आज आम्ही वर्ग १० व वर्ग १२ सर्व विद्यार्थी ९ वी व ११ वी वर्गाकडून निरोप घेत आहोत. आजचा दिवस हा आम्हाला फार दुःख
देणारा दिवस आहे. आम्ही ह्या शाळेच्या चपराशी पासून तर हेडमास्तर पर्यंत आम्हाला प्रेमोच्या मोहानं बुडविलं आहे. सर्व वर्गाचे विद्यार्थी मिळून खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यक्रमात हातभार लावत होतो. शाळा म्हणजे विद्येचे माहेर घर आहे. मंदिर आहे या पवित्र मंदिरात भगवानरूपी शिक्षकांना सोडून जाताना आमचे मन हळहळत आहे. या शाळेच्या आठवणी सदैव मनात राहणार. एक मुलगी जशी आईवडिलांना सोडून जाते तसेच आम्हा विद्यार्थ्यांचा किस्सा आहे.
विद्यार्थी मित्रांने आपण जास्त दुःख व्यक्त करू नका. कारण या जगात एक न एक दिवस असेच प्रत्येकाला निरोप घ्यावा लागतो. हाच निसर्गाचा नियम आहे. जसे पानांना झाडापासून, मुलींना आई वडिलांपासून
आज एक गोष्ट बोलावंसं वाटते ती अशी की वर्गात बरेच मुले-मुली असतात. काही मुलं अभ्यासात कमजोर असतात. त्यांना शिक्षक रागावतात म्हणून त्यांनी शिक्षकांचा राग मानू नये कारण शिक्षक हे देवता आहेत. विद्यार्थी जीवनातच शिक्षक मिळतो. मनुष्याच्या जन्मात विद्यार्थी जीवन फक्त एकदाच येते. आजपर्यंत शिक्षकांनी जें काही बोलेले ते आमच्या चागंल्याकरिता. त्यांच्या बोलण्यात प्रेम असते. आज राग-द्वेष सोडून द्या. आज सरांना सुध्दा ह्या गोष्टीचा काही तरी प्रभाव पडत असेलच या शाळेतून अनेक प्रकारे आपण शिकलो आहोत. अनेक महत्वाचे जीवनात पडणारे प्रभाव नवी गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. कवि. भा. रा. तांबे
नी म्हटले आहे की,
जनपळ भर म्हणतील हाय हाय, मी जात राहील कार्य काय, चंद्र झळकतील, सुर्य फळकतील असेच तारे वाहत राहतील मग काय होईल अंतराय
मित्रांनो ह्या कडव्यात कमी जास्त झाले असेल तर मला माफ करावे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या पेक्षा लहान आहात, आमच्याकडून जे छान घडले. त्यांना आपल्या आपल्या आचरणात आणा. वाईट घडले त्यांना सोडून द्यावे. मी संराना सुध्दा विनंती करतो की आमच्या कडून जे काही चुकले असेल तर माफ करावे. व आम्ही पुढे यशाचे शिखर गाठावे असाच आशिर्वाद द्यावा. ऐवढे
* बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय भारत….
बोल शारदा माता की जय









