“घोडा आणि नदी” मराठी बोधकथा marathi bodhkatha

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“घोडा आणि नदी” मराठी बोधकथा marathi bodhkatha

घोडा आणि नदी

एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते; परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजूबाजूला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा तो माणूस त्या लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारतो. मुलाने घोड्याकडे एकदा पाहिले आणि क्षणभर थांबून तो विश्वासाने म्हणाला, “निश्चितपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करू शकेल.”

मुलाचा हा सल्ला मानून त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली; परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की, नदी खूप खोल आहे आणि तो जवळ जवळ बुडायलाच लागला.

कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येऊन त्या मुलावर जोरात खेकसला. हे ऐकून मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, “पण माझी बदके तर खूप लहान आहेत आणि ती दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खूप लहान आहेत.”

 

Leave a Comment