“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-३ सन २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यांकनाबाबत mazi shala sundar shala 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-३ सन २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यांकनाबाबत mazi shala sundar shala 

संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ २. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १५ डिसेंबर, २०२५

Pdf download

विषयांकित प्रकरणी, संदर्भीय शासन निर्णयान्वये सन २०२५-२६ मध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा ३ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येत आहे.

२/- संदर्भीय शासन निर्णयातोल तरतूदीनुसार प्रत्येक विभागातून व प्रत्येक गटातून एक अशा विभागस्तरावरुन १६ व मनपा बृहन्मुंबई मधून २ आणि अ व ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रातून २ अशा एकूण २० शाळांचे मूल्यामापन राज्यस्तरीय समितीकडून करावयाचे आहे. त्यानुसार सदर शाळांच्या मूल्यांकनासाठी सोबतच्या यादीनुसार संचालक यांचे अध्यक्षतेखाली विभागनिहाय पथकांची नेमणूक करण्यात येत आहे. मूल्यांकनासाठी पात्र शाळांची माहिती दिनांक १३/०२/२०२६ रोजीनंतर ऑनलाईन पोर्टलव्दारे उपलब्ध होईल. त्याअनुषंगाने पथक प्रमुख यांनी विभागातील शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी पूर्वतयारी करावी. सदर मूल्यमापनाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. पथकातील सदस्य यांनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील शाळांचे मूल्यांकन प्रक्रियेच्या अनुषंगाने पथक प्रमुख यांच्या संपर्कात राहून त्यांच्या निर्देशानुरुप कार्यवाही करावी.

२. पथक प्रमुख यांनी दि.१७ ते २९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत पथकास नेमून दिलेल्या शाळा भेटी व शाळांची प्रत्यक्ष कामगिरीचे मूल्यमापन व अंतिम गुणांकन संदर्भीय नमूद निर्देशान्वये करुन तसा अहवाल राज्यस्तरीय मूल्यांकन समिती यांचेकडे दिनांक २३/०२/२०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता समक्ष सादर करावा,

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment