प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देणे बाबत mdm mid day meal shaley poshan ahar

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देणे बाबत mdm mid day meal shaley poshan ahar 

संदर्भ :

शासन निर्णय pdf download

– 1. शालेय शिक्षणव क्रीडा विभाग, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. शापोआ/2022/प्र.क्र.117/ एसडी3 दिनांक 28 जानेवारी 2025

2. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा.पुणे यांचे पत्र जा.क्र.प्राशिसं/पीएम पोषण/2024-25/01546 दिनांक. 18/03/2025

3. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा.पुणे यांचे जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/कार्यदिश/2025-26/03012

दिनांक. 06/06/2025

4. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा.पुणे यांचे जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/ परिपत्रक /2025-26/03106 दिनांक 11/06/2025

5. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. शापोआ/2024/प्र.क्र.144/ एसडी.3 1093480 दिनांक 12 जून 2025

6. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बीड यांचे पाककृती आदेश जिपबी/शिविप्रा/पीएमपोषण/3443 दिनांक 25/06/2025

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्याध्यर्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सदर योजने अंतर्गत इ.1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रोटीन युक्त व इयत्ता 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ परविण्यात येतो. शासन निर्णय दिनांक 02 फेब्रुवारी 20211 मधील तदतूदीनुसार तांदूळा पासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभविद्यार्थ्यांना देण्यात येत होता. संदर्भ क्रमांक 06 बीड जिल्हयासाठी पाककृती निश्चित करण्यात आलेली आहे.

माझे असे निर्देशनास आलेले आहे की, संदर्भ क्रमांक 06 अन्वये निश्चित केलेल्या पाककृती मध्ये दर बुधवारी पुरक आहार देणे बंधनकारक असताना शाळेतील विद्यार्थ्यांना पुरक आहार देण्यात येत नाही. त्यामुळे योजनेचा पुरेपुर लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही हि बाब अतिशय खेदजनक आहे. तरी आपणास याव्दारे पुनश्चच निर्देश देण्यात येत आहे की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांनी निश्चित केलेल्या पाककृती प्रमाणे विद्यार्थ्यांना दररोज आहाराचे वाटप करून विद्यार्थ्यांना आहारा सोबत देण्यात येणारा पूरक आहार (फळे, सोयाबीन, दूध चिक्की राजगिरा लाडू, बेदाणे, चुरमुरे, गुळ, शेंगदाणा, इत्यादी) देण्यात यावा, यामध्ये हयगय अथवा टाळाटाळ केल्यास आपणा विरुध्द प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंकृघ्यावी.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्याथ्यर्थ्यांना आहाराचा लाभ देणे बाबत

शासन निर्णय pdf download

संदर्भ :-

1. शालेय शिक्षणव क्रीडा विभाग, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. शापोआ/2022/प्र.क्र. 117/ एसडी3 दिनांक 28 जानेवारी 2025

2. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा. पुणे यांचे पत्र जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/2024-25/01546 दिनांक. 18/03/2025

3. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा. पुणे यांचे जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/कार्यदिश/2025-26/03012 दिनांक, 06/06/2025

4. मा. शिक्षण संचालक (प्रा) म.रा. पुणे यांचे जा.क्र.प्राशिसं/पीएम पोषण / परिपत्रक /2025-26/03106 दिनांक 11/06/2025

5. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. शापोआ/2024/प्र.क्र. 144/ एसडी.3 1093480 दिनांक 12 जून 2025

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सदर योजने अंतर्गत इ.1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रोटीन युक्त व इयत्ता 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ परविण्यात येतो. शासन निर्णय दिनांक 02 फेब्रुवारी 20211 मधील तदतूदीनुसार तांदूळा पासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना बीड जिल्हयासाठी पाककृती सन 2025-2026

1. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 12 पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी संदर्भ क्रमांक 01 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे.

2. तांदूळ व धान्यादी मालाची यापुढील मागणी नोंदविताना संदर्भिय शासन निर्णयाचे पालन होईल यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करुन यापुढील मागणी नोंदविण्यात यावी.

3. अंबाजोगाई, बीड, माजलगाव नगर पालिका कार्यक्षेत्रातील स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संदर्भिय शासन निर्णयानुसार तात्काळ मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

4. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आलेली आहेत. त्या अनुषंगाने आठवड्‌यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत बीड जिल्ह्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मान्यतेने सन 2025-2026 साठी खालील प्रमाणे पाककृती निश्चित करण्यात येत आहे.

5. शासन निर्णय दिनांक 28 जानेवारी 2025 च्या शासन निर्णयामध्ये पाककृती क्रमांक 11 अंडा पुलाव व पाककृती क्रमांक 12 अ) गोड खिचडी ब) नाचणी सत्व या पाककृती पर्याय स्वरूपात देण्यात येत आहेत. केंद्र शासनाने स्नेह भोजनाद्वारे योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीने सदर दोन पाककृतीचा लाभ व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा याकरिता शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.

6. विद्यार्थ्यांना आहारा सोबत देण्यात येणारा पूरक आहार (फळे, सोयाबीन, दूध चिक्की राजगिरा लाडू, बेदाणे, चुरमुरे, गुळ, शेंगदाणा, इत्यादी) प्रत्येक बुधवारी विद्यार्थ्यांना देण्यात यावे, तसेच केंद्रीय स्वयंपाक ग्रह प्रणाली अंतर्गत लाभ घेणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना सदरील पूरक आहार प्रत्येक बुधवारी देण्यात यावा. बुधवारी सुटी असेल तर लगतच्या दिवशी देण्यात यावा. याकरिता शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.

शासन निर्णय pdf download

उपरोक्त दिलेल्या निर्देशानुसार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या पाककृती नुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात यावा. आहारा मध्ये खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी

Related posts:

Leave a Comment