२२ डिसेंबर “राष्ट्रीय गणित दिवस” महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन national math’s day
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी कोइम्बतूरच्या (Coimbatore) इरोड गावात ब्राह्मण कुटुंबात (Brahmin Family) झाला. त्यांच्या आईचं नाव कोमलताम्मल आणि वडिलांचं नाव श्रीनिवास अयंगार होतं. त्याच्या जन्मानंतर, संपूर्ण कुटुंब कुंभकोणममध्ये गेलं, जिथं त्यांचे वडील श्रीनिवास यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरवात केली. सुरुवातीला रामानुजन अगदी सामान्य मुलासारखे होते. त्यांना वयाच्या तीन वर्षापर्यंत बोलताही येत नव्हतं. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यात त्यांना प्रथम क्रमांक देखील मिळाला. रामानुजन यांना गणित हा विषय खूप आवडत होता. इतर विषयांकडं मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळेच मद्रास विद्यापीठाची (Madras University) शिष्यवृत्ती त्यांना गमवावी लागली.
1911 मध्ये त्यांचा ‘जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीमध्ये 17 पानाचा एक पेपर प्रकाशित झाला. 1912 मध्ये रामानुजन यांनी ‘मद्रास पोर्ट ट्रस्ट’ मध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी रामानुजन यांना त्या काळातील जग प्रसिद्ध ब्रिटिश गणिततज्ञ ‘जी. एच. हार्डी यांच्या कार्याविषयी माहिती मिळू लागली. हार्डी यांच्या मार्गदर्शनात रामानुजन यांनी स्वतःचे 20 संशोधन पेपर्स प्रकाशित केले. 1916 मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि 1918 मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन हे त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली गणितज्ञ होते. यांनी गणितातील विश्लेषणे, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये विलक्षण योगदान दिले. रामानुजन यांनी 3900 हून अधिक गणिती निकाल आणि समीकरणे संकलित करण्यापासून त्यांचे नाव शोधण्यापर्यंत, गणितातील त्यांच्या अनेक संशोधनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले. रॉयल सोसायटीचे (Royal Society) सदस्य झाल्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळविणारे पहिले भारतीय ही ठरले रामानुजन ब्रिटनमध्ये असताना ब्रिटनचे थंड व ओलसर हवामान त्यांना मानवले नाही आणि त्यामुळेच त्यांची तब्येत खराब झाली आणि 1917 मध्ये त्यांना टीबी झाला. TB या आजारामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आणि ते भारतात परत आले. 26 एप्रिल 1920 रोजी 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये कोईंबतूरच्या इरोड गावात झाला होता. देश आणि जगातील काही महत्त्वपूर्ण गणिततज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. भारत सरकारनं त्यांच्या जीवनकार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला. वयाच्या 32 व्या वर्षी रामानुजन यांचं निधन झालं. 2015 मध्ये त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा ‘The Man Who Knew Infinity’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले होते. दरवरर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो.
त्यांनी फार कमी वेळातच फॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि महावीर यांच्यासह रामानुजन यांचंही नाव घेतलं जातं.










