निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत “निपुण सुपर शाळांतील” विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी घेणेबाबत nipun maharashtra abhiyan
संदर्भ: १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/एसडीई-६. दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ समक्रमांकित दिनांक ०५ मार्च, २०२५
२) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१५९०९९५/२०२५ दि. ०९ डिसेंबर २०२५
३) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१७२६४८०/२०२६ दि. १७ फेब्रुवारी २०२६
४) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि/निपुण महाराष्ट्र/२०२६/१८ दि.२० फेब्रुवारी २०२६
५) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, यांच्या अध्यक्षतेखाली VC द्वारे आयोजित आढावा बैठकीतील निर्देश दि.०६ मार्च २०२६
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता दुसरीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मार्च २०२५ ते जून २०२५ दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK chatbot वर नोंदवलेली आहे.
ऑगस्ट २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅप” मध्ये पर्यवेक्षीय यंत्रणेतर्फे पुनर्चाचणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रस्तुत कार्यालयात मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेला होता. तसेच डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ मध्ये सर्व विद्यार्थ्यांची मासिक अध्ययन स्तर चाचणी शिक्षकामार्फत पूर्ण झालेली असून, त्याचे सविस्तर सांखिकीय विश्लेषण शिक्षण विभागाच्या सर्व अधिकान्यांचे समक्ष दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाईन बैठकीत सादर करण्यात आलेले आहे.
तथापि, अभियानात आढळून आलेल्या “सुपर निपुण शाळा” (जेथे शाळेतील ८०% विद्यार्थ्यांनी चारही अध्ययन क्षमतांमध्ये अपेक्षित सर्वोच्च अध्ययन स्तर साध्य केले आहेत), अशा शाळांमध्ये पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत नमुना पुनर्पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन व अंबलबजावणी करण्यात यावी.
दि. १६ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ या कालावधीत “निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्ये” पर्यवेक्षीय यंत्रणेतर्फे निवडक विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी करण्यात यावी. जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील सुपर निपुण शाळा शक्यतो समान प्रमाणात ठरवून पर्यवेक्षीय यंत्रणेस शाळाभेट नियोजन आखून द्यावे. पुनर्चाचणीच्या अनुषंगाने आवश्यक बाबी म्हणजेच प्रत्येक सुपर निपुण शाळेतील, इयत्ता दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक तुकडीतील यादृच्छिकपणे निवडलेल्या ठराविक (साधारण ५ किंवा ५%) विद्यार्थ्यांची यादी व त्यांची फेब्रुवारी २०२६ मधील चाचणीची स्तर नोंदणी माहिती, निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्येच उपलब्ध करून देण्यात येईल. सदर पुनर्पडताळणी फक्त सोबत जोडलेल्या शाळांचीच घेण्यात यावी. पुनर्चाचणी दरम्यान शाळेमध्ये निदर्शनास आलेल्या तफावती व इतर गंभीर बाबींचा अहवाल देखील गरजेनुसार पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर सादर करावा. यासाठी विद्यार्थ्यांच्या मागील चाचणीची सर्व माहिती पर्यवेक्षीय यंत्रणेस उपलब्ध असेल, विद्यार्थ्यांचा आधीच्या चाचणीतील आवाज व हस्ताक्षरे देखील पाहता येईल.
याद्वारे मागील कालावधीत झालेल्या चाचणीचे व नोंदणीचे प्रमाणीकरण होईल. पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना झालेल्या कामाचे/नोंदीचे अहवाल व विश्लेषण “निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्येच” तात्काळ उपलब्ध होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरील सर्व यंत्रणेस स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात येईल. याचा वापर पाठपुरावा व जिल्हानिहाय कृती आराखड्यासाठी करणे आवश्यक आहे.
राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अध्ययनस्तर पुनर्चाचणी व नोंदणी सुरु होत असतानाच ७,५०० पेक्षा अधिक पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना यापूर्वीच लॉगिन देण्यात आलेले आहेत व ते सुरु राहतील. यामुळे प्रत्येक पर्यवेक्षकास साधारण १ ते २ शाळांचीच पुनर्पडताळणी करण्याचे कार्य असावे असे नियोजन करावे. याव्यतिरिक्त नव्याने पर्यवेक्षक पदभार स्वीकारलेल्या पर्यवेक्षकांसाठी जिल्ह्याने अशा अधिकाऱ्यांची माहिती एकत्र गोळा करूनच विहित एक्सेल नमुन्यात राज्याच्या “निपुण महाराष्ट्र अभियान” या ग्रुपमध्ये पाठवावी व mathsdept.maa.ac.in येथे इमेल करावी. त्यानुसार तात्काळ लॉगिन उपलब्ध करून देण्यात येतील.
निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्ये चाचणी घेताना पुढील कृती पायऱ्यांचा अवलंब करावाः
१) आपल्या भ्रमणध्वनीमध्ये निपुण महाराष्ट्र SCERT हे अँड्रॉईड अॅप डाउनलोड करावे. आपल्याकडे अँड्रॉईड फोन नसेल तर आपल्या सहकाऱ्याचा मोबाईल फोन वापरून त्यामध्ये आपले लॉगिन करून चाचणी घ्यावी.
२) लॉगिन करताना शिक्षण विभागात आपण नोंदविलेला संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर) नोंदवावा व त्यावर
आलेला OTP नोंदवून लॉगिन करावे. (प्रपत्र २ मध्ये जिल्हा व पर्यवेक्षक निहाय लॉगिन नंबर दिलेले आहेत) ३) आपल्या कार्यक्षेत्रातील सुपर निपुण शाळांपैकी आपणास जिल्ह्याने नेमून दिलेली शाळा पुनर्चाचणी निवडावी.
४) प्रत्येक शाळेतील निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल. प्रत्येक वर्गात ५% किंवा किमान ५ विद्यार्थ्यांचीच पुनर्चाचणी घ्यावी. यासाठी आपोआप यादृच्छिक नमुना निवड (Random sampling) पद्धतीने विद्यार्थी निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्येच उपलब्ध करून देण्यात येतील.
५) सुपर निपुण शाळांची यादी, शाळा निवड करण्याची सुविधा, पुनर्चाचणीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी केलेली स्तर नोंदणी व त्याचे पुरावे इत्यादी बाबी पर्यवेक्षकांना चाचणी घेतेवेळी अॅपमध्येच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
६) तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन नमुने जुळवून पाहण्याची सुविधा देखील तयार करण्यात आलेली आहे.
७) विशेष गरजा असलेले विद्यार्थी (CWSN) असल्यास चाचणी जतन करण्यापूर्वी तशी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
८) चाचणीसाठी आवश्यक सर्व सूचना अॅपमध्ये उपलब्ध असून त्यानुसार चाचणी प्रक्रिया पूर्ण करावी.
निपुण महाराष्ट्र (एससीईआरटीएम) अॅपमध्ये” पर्यवेक्षीय यंत्रणेतर्फे पुनर्चाचणी नोंदी करणे सुलभ होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रशिक्षण शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आपल्या स्तरावरून संबंधिताना अवगत करण्यात यावे. प्रशिक्षण लिंक निपुण महाराष्ट्र अभियान या whatsapp गटावर पाठविण्यात येईल
वरीलप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय पर्यवेक्षकीय यंत्रणेने आपल्या अधिनस्त शाळांची पुनर्चाचणी वेळेत होईल याची खात्री करावी.
सोबतः
१. फेब्रुवारी २०२६ मधील निपुण चाचणीनुसार पुनर्चाचणीसाठी निवडलेल्या जिल्हानिहाय सुपर निपुण शाळांची यादी.
२. जिल्हानिहाय पर्यवेक्षक लॉगिन सद्यस्थिती व पर्यवेक्षकांची नावे.
३. नवीन पर्यवेक्षक नोंदणीसाठी विहित एक्सेल नमुना.
४. पर्यवेक्षक लॉगिन मधून पुनर्चाचणी कशी घ्यावी यासाठीचा मार्गदर्शनपर डेमो व्हिडीओ लिंक









