निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra abhiyan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra abhiyan 

संदर्भ

: १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१५९०९९५/२०२५ दि. ०९ डिसेंबर २०२५

२) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि/निपुण महाराष्ट्र/२०२६/१८ दि.२० फेब्रुवारी २०२६

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, निपुण भारत अभियानांतर्गत सन २०२६-२७ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करून देणे हे राज्याचे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी निपुण महाराष्ट्र (SCERTM) अॅपद्वारे मासिक अध्ययन स्तर चाचण्या नियमितपणे घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांनी उत्साहाने सहभाग घेत अनुक्रमे सुमारे ३० लाख (८०%), ३२ लाख (८५%) व ३५ लाख (९०%) विद्यार्थ्यांची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या कालावधीत दररोज ५ ते ९ लाख विद्यार्थ्यांचे मूल्यमापन राज्यातील १.६ लाख शिक्षकांद्वारे करण्यात आले होते, ही बाब उल्लेखनीय आहे. मार्च २०२६ मधील पर्यवेक्षीय पुनर्चाचणीदरम्यान हे लक्षात आले की, शिक्षकांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी काही अपवाद वगळता वस्तुनिष्ठपणे व पारदर्शक होत आहेत ही बाब देखील समाधानकारक आहे.

मात्र, मार्च २०२६ मासिक चाचणी संदर्भात दि. २४ मार्च २०२६ पर्यंत पहिल्या दोन दिवसात केवळ ६.४८ लाख (१६.९%) विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण झालेली आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. काही जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्यांची प्रगती समाधानकारक नाही. राज्यस्तरावरून प्राप्त होणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यात येत असून, निपुण प्रणाली पूर्णतः कार्यरत आहे.

महत्त्वाचे निर्देशः

सदर मार्च २०२६ चाचणी ही चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम चाचणी आहे. या चाचणीच्या आधारे पुढील पुनर्मूल्यांकन प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्व कामकाजविहित कालमर्यादेत व पारदर्शकपणे पूर्ण करणे अत्यावश्यक

आहे. भंडारा, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ तसेच २०% पेक्षा कमी प्रगती असलेले सर्व जिल्ह्यांनी तात्काळ विशेष नियोजन करून गती वाढवावी.

कालमर्यादाः

दि. २८ मार्च २०२६ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर निपुण महाराष्ट्र (SCERTM) अॅपमधील चाचणी सुविधा बंद करण्यात येईल. या कालमर्यादेनंतर कोणतीही चाचणी घेता येणार नाही. अपेक्षित कार्यवाहीः

दररोजच्या प्रगतीचे काटेकोर नियोजन करावे. त्यासाठी जिल्हानिहाय अहवाल रोज संध्याकाळी उपलब्ध करून दिला जातो तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेस हे सर्व अहवाल निपुण महाराष्ट्र (SCERTM) अॅपमध्येच उपलब्ध आहेत.

सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांना स्पष्ट जबाबदारी द्यावी.

प्रत्यक्ष शाळा स्तरावर विचारणा करावी.

जिल्हा व तालुका स्तरावर नियमित आढावा घेऊन प्रगती सुनिश्चित करावी.

सर्व क्षेत्रीय व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थी यांचा समावेश सदर चाचणीत होणे गरजेचे आहे या दृष्टीने वरीलप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी.

Related posts:

Leave a Comment