राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये स्पीकर सेट (PA System) उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्याबाबत pa system speaker set paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये स्पीकर सेट (PA System) उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्याबाबत pa system speaker set paripatrak 

वाचा:-

(१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण २४११/ (८०/११)/ अर्थसंकल्प, दिनांक २३ सप्टेंबर, २०११.

(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय, क्रमांक- भांखस-२०१४/ प्र. क्र. ८२/ भाग-III/उद्योग-४, दिनांक ०१ डिसेंबर, २०१६.

(३) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं / २०२६/ स्पिकर-२/१०४, दि.०३.०७.२०२६.

प्रस्तावनाः-

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ हा राज्यामध्ये दि. ०४.०४.२०१० पासून लागू झालेला आहे. या कायद्यानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० नुसार शाळांमध्ये आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देऊन, मुलांना २१ व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात केलेल्या अशा समग्र व अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यावर भर दिलेला आहे. त्या अनुषंगाने मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागातील शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी विविध विशेष उपक्रम राबविण्याबाबत चर्चा होऊन आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना शैक्षणिक साहित्य अंतर्गत स्पीकर सेट (PA System) देण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून शासनास प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

२. उपरोक्त बाब विचारात घेऊन, संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयामधील अनुज्ञेयता पाहता, मा. मंत्री, शालेय शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६,००० शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य अंतर्गत स्पीकर सेट (PA System) देण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संदर्भ क्र. ३ येथील दि. ०३.०७.२०२६ रोजीच्या पत्रान्वये उपयोगिता तसेच मानके / विशिष्ट निकष इत्यादीसह शासनास प्रस्ताव सादर केलेला आहे.

३. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६,००० शाळांमध्ये स्पीकर सेट (PA System) उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांनी संदर्भ क्र. ३ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६,००० शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य अंतर्गत स्पीकर सेट (PA System) पुरवविण्याच्या अनुषंगाने अंदाजित रु. २०.८० कोटी (अक्षरी रुपये वीस कोटी ऐंशी लक्ष फक्त) इतक्या रकमेस शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६,००० शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य अंतर्गत स्पीकर सेट (PA System) पुरविणेबाबतची खरेदी प्रक्रिया राबविण्यास देण्यात येत असलेली प्रशासकीय मान्यता ही खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येत आहे :-

(२.१) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६,००० शाळांमध्ये पुरविण्यात येणारे स्पीकर सेट (PA System) हे “शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका”, याबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेल्या संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णय क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भा-III/ उद्योग-४, दि. १ डिसेंबर, २०१६ मध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धती व तद्नंतर त्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील विहित अटी, शर्तीच्या अधीन राहून ई-निविदा राबवून खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

(२.२) प्रस्तुत ई-निविदेतील न्युनतम दरधारक (L-1) यांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि. ०१ डिसेंबर, २०१६ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या “शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिकेत विहित केलेली कार्यपध्दती तसेच शासनाचे प्रचलित नियम विचारात घेऊन निविदा अंतिम करावी.

(२.३) स्पीकर सेटच्या (PA System) किंमतीमध्ये DESIGN, SUPPLY (incl.transportation), INSTALLATION, व GST इत्यादी सर्व बाबींचा एकत्रितरित्या समावेश असेल, निविदाकार ई-निविदेमध्ये वरील बाबीसाठी वेगवेगळ्या किंमती दर्शविणार असल्यास संबंधित निविदा विचारात घेतली जाणार नाही. 5

३. संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय, दि. २३ सप्टेंबर, २०११ अन्वये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे (सायन्स कीट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच, शैक्षणिक साहित्य इ.) या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यतील शाळांमध्ये डिजिटल, गुणवत्तापूर्ण, आनंददायी व समावेशक शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक

साधन म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६,००० शाळांमध्ये स्पीकर सेट (PA System) उपलब्ध करून देण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचे प्रारूप शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी तयार करावे व त्यास शासनाची मान्यता घ्यावी.

४. सदर खरेदीबाबतचा खर्च मागणी क्र. ई-२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ००१, संचालक व प्रशासन (००) (००) (०१) विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, (२२०२ L ०६६) या लेखाशीर्षांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या तरतूदीमधून भागविण्यात येईल. याकरिता निधी वितरणाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. त्या अनुषंगाने निधी वितरणाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

५. सदरचा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील भाग पहिला उपविभाग-३, अनुक्रमांक-४, परिच्छेद क्र. २७ (२) (ब) व वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२३/प्र.क्र. ४०/अर्थ-३, दि. १२.०४.२०२३ अन्वये विभागाला प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असुन त्याचा संकेतांक २०२६०७२९१५४४१८६६४९ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment