ई-ऑफिस (e-Office) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन क्षमता तपासणे व पदोन्नतीपूर्वी प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी (Practical Typing Test) अनिवार्य करण्याबाबत eoffice practical typing test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ई-ऑफिस (e-Office) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन क्षमता तपासणे व पदोन्नतीपूर्वी प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी (Practical Typing Test) अनिवार्य करण्याबाबत eoffice practical typing test 

विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

(महसूल विभाग)

दिल्ली गेट जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर परिपत्रक – जा.क्र.2026/मशाका-१/आस्था-०७/कावि-१०६२/ई-१८४६२९८

दिनांक- सप्टेंबर २०२६ (ई-स्वाक्षरीखालील)

परिपत्रक

प्रस्तावना

१ महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कागदविरहित (Paperless) प्रशासनाला चालना देण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व गती आणण्यासाठी ‘ई-ऑफिस’ (e-Office) प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

२ ई-ऑफिस प्रणालीची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी पूर्णतः कर्मचाऱ्यांच्या संगणकीय आणि टंकलेखन क्षमतेवर अवलंबून आहे. विशेषतः ज्या पदांसाठी टंकलेखन ही अनिवार्य/विहित अर्हता आहे, अशा पदांवरील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मराठी टंकलेखनाचे (Marathi Typing) परिपूर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

३ तथापि, काही प्रकरणांमध्ये उमेदवारांकडे कागदोपत्री टंकलेखन प्रमाणपत्र उपलब्ध असूनही, प्रत्यक्ष ई-ऑफिसवर काम करताना त्यांना संगणकावर टंकलेखन करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नती दिल्यास ई-ऑफिस प्रणालीच्या वेगावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे शासकीय कामकाजाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यापूर्वी केवळ कागदपत्रांची तपासणी न करता, त्यांची प्रत्यक्ष टंकलेखन कार्यक्षमता चाचणी (Practical Typing Test) घेणे प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत गरजेचे झाले आहे.

४ त्या अनुषंगाने, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व शासकीय विभाग, प्रादेशिक कार्यालये व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेतः

प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी अनिवार्यताः

५ ज्या गट क संवर्गातील पदांना “टंकलेखन” ही अट विहित केलेली आहे (उदा. लिपिक-टंकलेखक इ.), अशा पदांवरून पुढील प्रथम साखळी पदावर पदोन्नती (Promotion) देण्यापूर्वी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची संगणकावर प्रत्यक्ष मराठी टंकलेखन चाचणी घेणे अनिवार्य राहील.

पदोन्नतीसाठी चाचणी उत्तीर्ण होणे बंधनकारकः

६ केवळ टंकलेखन प्रमाणपत्र तपासून किंवा सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे पदोन्नती दिली जाणार नाही. प्रत्यक्ष चाचणीत निश्चित केलेल्या निकषानुसार उत्तीर्ण झाल्याची खात्री पटल्यानंतरच संबंधित कर्मचाऱ्याचा पदोन्नतीसाठी विचार केला जाईल.

चाचणीचे स्वरूप व निकषः

सदर चाचणी ही मराठी टंकलेखन संगणकावरच घेतली जावी.

चाचणीमध्ये टंकलेखनाचा वेग (Speed) आणि अचूकता (Accuracy) या दोन्ही बाबी तपासल्या जाव्यात.

कार्यालय प्रमुखांनी चाचणीसाठी गुणवत्तेचे वस्तुनिष्ठ निकष पूर्वनिर्धारित करावेत.

पारदर्शकता व निष्पक्षताः

८ सदर टंकलेखन चाचणी घेण्याची संपूर्ण कार्यवाही संबंधित कार्यालय प्रमुखांनी स्वतःच्या देखरेखीखाली अत्यंत पारदर्शक, न्याय्य व निष्पक्ष वातावरणात पूर्ण करावी. चाचणीची संपूर्ण अभिलेखे ठेवण्यात यावेत.

अनियमितता आढळल्यास कारवाईः

९ जर एखादे टंकलेखन प्रमाणपत्र बनावट किंवा गैरमार्गाने मिळवल्याचे चाचणीदरम्यान निदर्शनास आल्यास, संबंधित कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार तात्काळ शिस्तभंगविषयक आणि कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.

१० वरील सर्व सूचनांचे विभागातील सर्व शासकीय कार्यालयांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. या सूचनांचे उल्लंघन झाल्यास किंवा अंमलबजावणीत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कार्यालय प्रमुख (Head of Office) यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल.

११ सदर परिपत्रक आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालये, शाखा व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आणून देऊन त्याची अंमलबजावणी सुरू करावी.

शासन निर्णय pdf download 

Leave a Comment