संकलित-१ (PAT २) च्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेबाबत pat chachni live report download
संदर्भ: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० (NEP-२०२०)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र या कार्यालयामार्फत दरवर्षी तीन वेळा नियतकालिक चाचण्या (Periodic Assessment Test – PAT) घेण्यात येतात. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना संकलित चाचणी १ (PAT २) या विद्यार्थ्यांचा वर्ग व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादणूकीचा अहवाल (Live Report) Swift Chat App वर पाहण्याची अथवा Download करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या Live Report च्या आधारे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील त्रुटी व बलस्थाने ओळखता येतील. अध्ययन निष्पत्तीनिहाय इ. २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या उपचारात्मक अध्यापनासाठी व पुढील अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करण्यास मदत होईल. शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती या पर्यवेक्षकीय यंत्रणेने वर्ग भेटीदरम्यान सदरील अहवालानुसार विद्यार्थ्यांची संपादणूक पडताळणी करावी.
Swift Chat App मध्ये सदरील Live report पाहणे अथचा Download करण्यासाठी Bot Link / QR Code User Manual सोबत देण्यात येत आहेत. सदरील बाब सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी. User Manual-https://tinyurl.com/liveReport sermanual Bot Link: https://links.swiftchat.ai/y7VpX7
QR Code









