पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ प्रेस नोट pavitra portal pranali shikshak bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ प्रेस नोट pavitra portal pranali shikshak bharti 

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.

. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले त्यातील उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत.

मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०८/२०२६ या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.

. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापननिहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील :

पदनिहाय निहाय रिक्त व शिफारस झालेल्या पदांचा तपशील :

समांतर आरक्षणातील माजी सैनिक (१५ %) अंशकालीन (१०%) याप्रमाणे जाहिरातीत पदे मंजूर आहेत. त्याप्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने २७६० पदे व १७६० पदे रिक्त राहिली आहेत, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १४०८ पदे रिक्त राहिली आहेत.

. सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने Converted Round घेऊन भरण्यात येणार आहेत.

मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.

. उमेदवारांना https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे.https://mahateacherrecruitment.org.in/

. सध्या उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात येईल.

. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे/मागणी इ. बाबी साठी राज्यस्तरावर “तक्रार निवारण व दुरुस्ती समिती” स्थापन करण्यात आली आहे. edupavitra२०२५grcc@gmail.com या ईमेलवर दिनांक ०६/०९/२०२६ अखेर पर्यंत पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.

. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment