सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि.११.०२.२०२६ नुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत pesa shikshak padbharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि.११.०२.२०२६ नुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत pesa shikshak padbharti 

संदर्भ : १. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय बीसीसी २०१८/प्र.क्र.४२७/१६-ब, दि.०१.०२.२०२३

२. शालेय शिक्षण विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.१३/टिएनटि१, दि.०३.०४.२०२३

३. शालेय शिक्षण विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र.१३/टिएनटि१, दि.१०.०८.२०२३

४. या कार्यालयाचे आपणांस उद्देशून लिहिलेले पत्र जा.क्र. आस्था/प्राथ १०६/शा.प.-पेसा पदभरती / २०२३/५१६४, दि.२२.०८.२०२३

५. टेट-२०२२ नुसार पदभरती अंतर्गत पवित्र पोर्टलवर उमेदवारांसाठी प्रसिद्ध सूचना दि.२७.०२.२०२४

६. शालेय शिक्षण विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.४१४/टिएनटि१, दि.१५.०७.२०२४

७. या कार्यालयाचे आपणांस उद्देशून लिहिलेले पत्र जा.क्र. आस्था/प्राथ १०६/शा.प.-पेसा

के.पद/२०२४/४४८१. दि.१९.०७.२०२४

८. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय बीसीसी-२०२३/प्र.क्र.५४/ आरक्षण-५, दि.११.०२.२०२६

९. शालेय शिक्षण विभागाचे शासन पत्र क्र.संकीर्ण २०२६/प्र.क्र.४८/टीएनटी-१, दि.२०.०२.२०२६

उपरोक्त विषयबाबत कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ सामान्य प्रशासन विभाग, यांच्या दि.०१.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्यांचे प्रमुख यांनी पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीकरिता संदर्भ क्र.२ दि.०३.०४.२०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती. सन २०२३ मध्ये ग्राम विकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील अन्य प्रवर्गातील शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांची कार्यवाही झाल्यानंतर नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्यांकडून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते.

तरी, अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने पवित्र प्रणाली मार्फत पद‌भरतीस काही कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेऊन संदर्भ क्र.३ येथील दि.१०.०८.२०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) २०२२ दिलेल्या ST PESA उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच, या उमेदवारांना पवित्र पोर्टलमार्फत सर्वसाधारण भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार अन्य रिक्त पदांवर निवडीचा पर्याय खुला ठेवण्यात आला होता, त्यानुसार या कार्यालयाचे संदर्भ क्र.४ येथील दि. २२.०८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये टेट-२०२२ चाचणी दिलेल्या ST PESA असे नमूद केलेल्या सर्व उमेदवाराची माहिती आपणास निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

तथापि, निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.२५४८/२०२३ (A N०.१४५९५/२०२३) दाखल होती. त्यातील दि. २७ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या न्यायनिर्णयाविरोधात मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा याचिका क्र.२२१०९/२०२३ दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश होईपर्यंत पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदभरतीच्या कार्यवाहीस सामान्य प्रशासन विभाग यांचेकडून स्थगिती देण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात सन २०२४ मध्ये टेट-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये पेसा क्षेत्राबाबत मा. न्यायालयाचे निर्णय आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, यास्तव सदर उमेदवारानी आपल्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित अन्य जिल्ह्यांकडे उपस्थित राहून करण्याचेही संदर्भ क्र.५ येथील दि.२७.०२.२०२४ रोजीच्या सूचनांमध्ये उमेदवारांना कळविण्यात आले होते. त्यामुळे आता गुणवत्तेनुसार आपल्या जिल्हयातील पैसा क्षेत्रात नियुक्तीस पात्र असलेले परंतु अन्य जिल्हयात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने रुजू झाले नसले तरी स्वतःच्या जिल्हयातील पैसा क्षेत्रात रुजू होण्यास इच्छुक असल्यास त्यांचा निवडीसाठी विचार करण्यात यावा.

अन्य जिल्ह्यातील व अन्य प्रवर्गातील उमेदवारांची स्पर्धा नसल्याने स्थानिक उमेदवार तात्काळ उपलब्ध होण्याच्या रष्टीने शासनाकडून संदर्भ क्र.६ दि.१५ जुलै, २०२४ च्या पत्रान्वये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत टेट-२०२२ शिफारस पात्र १५४४ उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीकरीता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सदर्भाधीन क्र.८ येथील सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.११.०२.२०२६ अन्वये मा. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. यापूर्वी जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रीयेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याचे संदर्भ क्र. ९ येथील शालेय शिक्षण विभागाचे शासन पत्र दि.२०.०२.२०२६ अन्वये निर्देश आहेत.

शासन परिपत्रक pdf download

त्याप्रमाणे आपल्यास्तरावरुन शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार गुणवत्तेनुसार ST PESA क्षेत्रासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्तीस पात्र असल्याची खात्री करूनच उक्त शासन निर्णय दि.११.०२.२०२६ नुसार आरक्षण मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. तद्नंतरही रिक्त राहणारी पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्यासाठी पुढील आवश्यक कार्यवाही अनुसरण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment