आरटीई २५ टक्के पोर्टलवर शाळांची फीस नोंदणी करणेबाबत right to education registration fees

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरटीई २५ टक्के पोर्टलवर शाळांची फीस नोंदणी करणेबाबत right to education registration fees

उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. तसेच आरटीई २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्यांची शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार शाळांना प्रतिपूर्ती देण्यात येते. शाळेची फीस व शासनाने ठरवून दिलेला प्रतिपूर्तीचा दर यामध्ये जी कमी असेल ती रक्कम शाळांना अदा करण्यात येते.

आरटीई २५ टक्के पोर्टलवरती शाळांनी आकारलेली फीस ची नोंद करणे अनिवार्य असताना सुध्दा आपल्या जिल्हयातील आरटीई २५ टक्के प्रवेश देणाऱ्या शाळांनी त्यांचे फीस चे दर आरटीई पोर्टलवर नोंदविलेले नाहीत ही बाब गंभीर आहे. तरी आपणास सक्त सूचना देण्यात येते की, आरटीई पोर्टलवर शाळांच्या मुख्याध्यापकांच्या लॉगीनवर Reimbursement —> term fee and tution fee या टॅबवर तात्काळ फीस ची रक्कम भरण्यात यावी. याबाबत मा. आयुक्त (शिक्षण) यांचे निर्देश असल्याने तातडीने याबाबत कार्यवाही करावी.

Related posts:

Leave a Comment