मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार देणे बाबत rikta padacha karyabhar padbhar babat paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार देणे बाबत rikta padacha karyabhar padbhar babat paripatrak 

संदर्भ:- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील बैठक दि.२७/०८/२०२१

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास सुचित करण्यात येते की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिर्खइद, जालना यांचे दालनात दि. २७/०८/२०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये विषयांकित पदाचा पदभार सेवाकनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे दिलेले असल्याचे मा.मु.का.अ. यांचे निदर्शनास आलेले असल्याने जिल्ह्यातील विषयांकित रिक्त पदांचे अतिरिक्त पदभार देताना सेवाज्येष्ठतेनुसार तसेच तत्सम पदाला आवश्यक असलेल्या अर्हतेनुसार देणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.

तसेच या कार्यासनाचे पत्र क्र.२१६१ दि. ०२/०९/२०२१ नुसार आवश्यक माहिती सादर करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. तथापी आजपावेतो कोणत्याही तालुका कार्यालयाने माहिती सादर केलेली नाही. ही बाब प्रशासकिय दृष्ट्या योग्य नाही.

तसेच मा.मु.का.अ.यांनी दिनांक १५ सप्टेंबर, २०२१ रोजी बैठक आयोजित केलेली आहे. सदर बैठकीपुर्वी विषयांकित प्रकरणी कार्यवाही करून अहवाल सादर करावा. विलंबाबाबत सर्व संबधीतावर मा.मु.का.अ. यांचे सुचनेनुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल याची गंभीर नोंद घ्यावी.

Related posts:

1 thought on “मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार देणे बाबत rikta padacha karyabhar padbhar babat paripatrak ”

Leave a Comment