सूत्रसंचालन स्वागत करण्यासाठी प्रभावी मराठी चारोळ्या sutrasanchalan swagat
” पाहण्याचे स्वागत करणे
ही तर आपली रीत…….
तालासुरांनी शब्द सजतात
तेव्हा जन्मते स्वागतगीत……”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
“संस्कृतीची रीत अशी की…
सदैव तत्पर आतिथ्याला
कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो…
शब्दफुले ही स्वागताला….”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
स्वागत … म्हणजे आपुलकीचा गंध
स्वागत … म्हणजे जिव्हाळ्याचे बंध
स्वागत… म्हणजे संस्काराचे लेणे
स्वागत… म्हणजे मानसन्मान देणे
श्रद्धेचे आसन… स्नेहाची सुमने
आपल्या स्वागतासाठी .. …. आतुर झाली मने
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
” नावीन्याची आस उत्तमाचा ध्यास
योग्य निर्णय अभ्यासाची कास
आव्हानांचे भान परिस्थितीची जाण
तुमच्या रुपाने लाभले अतिथींचे वरदान ”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
” सेवेसी इमान आपुले मानवतेशी नाते
विज्ञानावर निष्ठा तुमची स्वप्न भरारी घेते
देशावरची भक्ती आपण मनोमनी भरता
आतुरलो आम्ही आपुल्या स्वागता करता ”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
” आपले येणे केवळ येणे नसते…
काळजावर कोरलेले लेणे असते…..
निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता
ज्ञानी ..गुणी… प्रज्ञावंत विराजमान होता
आपला प्रत्येक विचार अनुभवांचे देणे असते
आपले येणे केवळ येणे नसते
काळजावर कोरलेले लेणे असते ”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
” येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले
स्वागताला आपल्या सूरही आतुरले ”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
” उत्साहाचा, आनंदाचा, चैतन्याचा मेळा
हा स्वागताचा सोहळा
कृती आपली असे विश्वासक
कलेचेही तुम्ही उपासक
ज्ञाना सोबत उन्नत केले संस्कृती
अन् कला हा स्वागताचा सोहळा ”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
” अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा
रत्नाहूनही अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा
सुख दुःखाच्या जाणिवांना तुम्ही अजरामर करता
अधीर झालो आम्ही आपल्या स्वागता करता ”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
‘स्वागत करण्या आपले मने आतुर जाहली
भावनांना शब्दाची अन् साथ सुरांना लाभली “
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आग्रहास्तव तुम्ही उपस्थित
सेवेसाठी सदा समर्पित
सहवासाचे भाग्य मिळू द्या
आम्हा अनंत वेळा
हा स्वागताचा सोहळा “









