खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत samayojan shasan paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत samayojan shasan paripatrak

खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत.

उपरोक्त विषयावरील शासनाचे क्रमांक जिपब ४८१७/प्र.क्र.५९०/आस्था-१४, दि. १२/१२/२०१७ चे पत्र कृपया पहावे.

२. उपरोक्त पत्रान्वये खाजगी अनुदानित, प्राथमिक, उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे प्रतिनियुक्तीने त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये पदस्थापना देण्याबाबत शासनाने जो निर्णय घेतला आहे, त्या निर्णयास अनुसरुन संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये हजर करुन घेवून, नियुक्ती देण्याबाबत आपणास कळविण्यात आले होते.

३. मात्र, यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्यक्षात हजर झालेल्या शाळांतील शिक्षकांबाबत शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या अनौपचारिक माहितीनूसार, बऱ्याच जिल्हा परिषदांनी अद्यापही, अशाप्रकारे हजर करुन घेतले नसल्याचे, निदर्शनास आले आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करणे, हे प्रशासकियदृष्ट्या बेजबाबदारपणाचे आहे.

४. या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, आपल्याकडे शालेय शिक्षण विभागाने आपल्या जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांची यादी पाठविली आहे.

अ) सर्व प्रथम अशा शिक्षकाची ज्येष्ठता यादी (Seniority List) तयार करावी.

ब) यामधील किती शिक्षकांची जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर आवश्यकता आहे हे एकदा निश्चित करुन घेतल्यानंतर वरील यादीतील ज्येष्ठतम शिक्षकांना आपल्या जिल्हा परिषदमध्ये सामावून घेण्यात यावे.

क) तद्नंतर शिल्लक राहिलेल्या शिक्षकांची यादी बनवून ती शालेय शिक्षण विभाग व संचालक, शालेय शिक्षण यांना पाठविण्यात यावी.

ड) शालेय शिक्षण विभागाने पाठविलेल्या यादीतील शिक्षक सामावून घेवूनही जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त राहत असतील तर रिक्त जागांचा तपशिल नियमित कार्यपध्दतीनुसार शालेय शिक्षण विभाग व संचालक, शालेय शिक्षण विभाग तसेच या विभागास अवगत करावे.

इ) पात्र यादीतील शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये हजर राहण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात यावेत, जे शिक्षक हजर राहणार नाही. त्या शिक्षकांची यादी बनवून शालेय शिक्षण विभाग व संचालक, शालेय शिक्षण यांना पाठवावी.

५. अशी पदस्थापना देताना, गरोदर महिला व स्तनदा माता तसेच विशेष संवर्ग भाग-१ मध्ये मोडणारे जे शिक्षक रॅण्डमायझेशन राऊंडमध्ये अवघड क्षेत्रात गेले आहेत, अशा शिक्षकांना सर्वप्रथम सोईच्या ठिकाणी रिक्त जागेवर (Clear Vaccancy) पदस्थापना देण्यात यावी. व त्यांच्या पदस्थापनेने रिक्त झालेल्या जागेवर खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना पदस्थापना द्यावी.

६ त्यानंतरही खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक पदस्थापनेशिवाय राहत असल्यास, विद्यार्थ्यांचे हित लक्षात ठेवून, उपलब्ध खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या संख्येच्या प्रमाणात समानिकरणासाठी अनिवार्य रिक्त ठेवलेल्या जागा, खुल्या करण्यात याव्यात. त्या समानिकरणांच्या जागेवर गरोदर महिला व स्तनदा माता तसेच विशेष संवर्ग भाग १ मध्ये मोडणारे जे शिक्षक रॅण्डमायझेशन राऊंडमध्ये अवघड क्षेत्रात गेले आहेत, अशा शिक्षकांना त्याठिकाणी पदस्थापना देवून, त्यांच्या जागी खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना पदस्थापना द्यावी.

७. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करताना, रॅण्डमायझेशन राऊंडमध्ये गेलेल्या शिक्षकांना निव्वळ रिक्त व अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांना पदस्थापना देताना, त्यांची ज्येष्ठता विचारात घेवून, समुपदेशनाने पदस्थापना द्यावी.

शासन निर्णय pdf download

८. तसेच, जे शिक्षक अशा प्रयत्नानंतरही जिल्हा परिषदेच्या सेवेत हजर होत नाहीत, अशा शिक्षकांच्या नावांची तपशीलवार यादी शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय तसेच शिक्षण संचालक, पुणे यांच्या कार्यालयास पाठवावी, ही विनंती

Related posts:

Leave a Comment