सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत sanchmanyat samayojan
संदर्भ संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा२०२-४२५/समायोजन/टी-०८/१५५२००९, दि.२०.११.२०२५.
उपरोक्त विषयान्वये मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी दाखल याचिका क्र. ५४५६/२०२५ मधील मा. न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दि. १५.०३.२०२५ अन्वये निर्गमित संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दतीचा अवलंब करुन समायोजना प्रक्रीया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशिल / अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग विषय/अनुदानाचा/व्यवस्थापनाचा प्रकारासह) संचालनालयास, सादर करणेसाठी संचालनालयाचे पत्र दि. २०.११.२०२५ अन्वये क्षेत्रिय अधिका-यांस कळविण्यात आले होते.
तथापि, सन २०२५-२६ च्या ऑनलाईन संच मान्यताबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्यात असल्याने तसेच सन २०२४-२५ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रीया माहे. डिसेंबर, २०२५ मध्ये राबविणे व सन २०२५२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रीया संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रीया राबविण्याऐवजी सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झालेनंतरच समायोजन प्रक्रीया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांचे स्तरावरुन दि. २०.११.२०२५ च्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबतच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे.
तसेच सन २०२५-२६ च्या संचमान्यता निर्गमित झालेनंतर विहित कार्यपध्दतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजना करण्यात यावे,











