दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्याबाबत say pasaydan in school of maharashtra
संदर्भ :- मा. मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश, दिनांक २९ जुलै, २०२५
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन निर्देशाची प्रत त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रतींसह या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
२. सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष आहे. येत्या दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी “गोकुळ अष्टमीस” संतश्रेष्ठ श्री. ज्ञानदेवांची ७५० वी जयंती असल्याने, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे, असे मा. मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश आहेत.
३. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशास अनुसरून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व दि. १४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे यासंदर्भात आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, तसेच, सदर सूचनेची सुयोग्य अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याबाबत देखील संबंधितांना कळविण्यात यावे, ही विनंती.











