आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ “डॉ.जयंत नारळीकर” scientist jayant naralikar
डॉ. जयंत नारळीकर
गुरुत्वाकर्षण संबंधांतील सिद्धांत
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व पदार्थ वैज्ञानिक
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकर प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील प्राध्यापक होते. आई मुंबई विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या.
या निसर्गात अनंत नक्षत्र, आकाशगंगा चंद्र, सूर्य, तारे कसे निर्माण झाले, याबद्दल वैज्ञानिक कित्येक शतकांपासून उत्तर शोधत आहेत. बहुतेक शास्त्रज्ञ मंडळींचा विश्वास आहे की, ही निर्मिती कुण्या समृद्ध अशा आण्विक वस्तुच्या नैसर्गिक स्फोटामुळे झाली असावी. यालाच आपण ‘बिग बँग डेअरी’ म्हणून संबोधतो. वरील परंपरेनुसार लिहित असलेल्या गोष्टीवर भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा विश्वास नव्हता. डॉ. नारळीकर ‘स्टडी स्टेट’ वर विश्वास ठेवत होते. या सिद्धांतानुसार सृष्टी एकसारखी राहते. सारे काही ‘आकाशगंगा’ व बाकीच्या तत्त्वांच्या रूपात संपूर्ण निसर्गात सारखेच विखुरले गेले आहे. काही ठरावीक आकाशगंगा व अन्य नक्षत्रांच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या खाली जागा भरण्यासाठी नवीन पदार्थांची निर्मिती होते. केवळ २६ वर्षांचे असताना ‘स्टेडी स्टेट’ सिद्धांतावर काम करण्याव्यतिरिक्त जयंत नारळीकरांनी त्यांचा प्राध्यापक मित्र हॉयलफ्रेडसोबत संशोधनकार्य गुरुत्वाकर्षणाच्या नवीन सिद्धांताची निर्मिती केली. या सिद्धांताचे महत्त्व आइन्स्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताएवढे महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक ‘विज्ञान कथा’ लिहिल्या. ‘आकाशाशी जडले नाते’ हे पुस्तक लिहिले. त्यांचा गणित हा विषय आवडता होता. कृष्णविवरासंबंधित त्यांनी केलले महत्त्वपूर्ण संशोधन, विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी केलेले लेखन आणि भारतातील खगोल जयंत नारळीकर यांचं कार्य अनमोल ठरते. भौतिकशास्त्राच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आयुका’ सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पात घेतलेला पुढाकार, यामुळे
त्यांचा जन्म १९ जुलै, १९३८ रोजी कोल्हापूर इथे झाला. बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी घेऊन पुढील शिक्षणासाठी ते टाटा शिष्यवृत्ती मिळवून कॅम्ब्रिज इथे गेले. इसवी सन १९६३ मध्ये प्रा. फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली खगोल भौतिकशास्त्रात महत्त्वाचे संशोधन करून त्यांनी विशेष गुणवत्तेसह डॉक्टरेट मिळवली. १९७२ मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च’ मध्ये अध्यापनाचे काम केले. त्यानंतर विदधापीठात अनुदान आयोगाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. ‘हॉयल नारळीकर सिद्धांत’ म्हणून त्यांचे संशोधन प्रसिद्ध आहे. त्यांच्या संशोधनामुळे गुरुत्वाकर्षणासंबंधी
नवीन सिद्धांत तयार झाला. त्याला ‘कन्फर्मल थिअरी ऑफ मॅव्हीटी’ म्हणून ओळखले जाते. याखेरीज नारळीकरांनी भारतातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत रेडिओ लहरी, गुरुत्वाकर्षण, अवकाश विज्ञान यांसंबंधी अनेक संशोधनात भाग घेतला. डॉ. नारळीकर विज्ञान लेखक म्हणून लोकप्रिय आहेत. इंग्रजी व हिंदी प्रम ाणेच मराठीतील विज्ञान लेखनात त्यांचा फार मोठा वाटा आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही त्यांनी विज्ञान प्रसाराचं काम केलं. भौतिक आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र ‘आयुका’ कार्यान्वित करण्यात त्यांनी मोलाची मदत केली. डॉ. नारळीकरांना त्यांच्या संशोधन व विज्ञान प्रसारासाठी ‘डॉ. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार’, युनेस्कोचा ‘कलिंग’ पुरस्कार, ‘राष्ट्र भूषण फाउंडेशन’ पुरस्कार यासह ‘ब्रिटनच्या रॉयल’ सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व, स्पेनमधील ‘आयएसी-बीबीव्ही फाउंडेशन’ अतिथी प्राध्यापक म्हणून आमंत्रण असे अनेक मानसन्मान लाभले. डॉ. नारळीकर अंधश्रद्धा दूर व्हावी, म्हणून नेहमीच प्रयत्नशील असतात.
संशोधक बुद्धी
केले निरीक्षण भारी
जनसेवा, देशभक्ती
ज्ञानकण आम्हा शिदोरी !










