इ.4थी 7वी शिष्यवृत्ती परीक्षा कट ऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाले असल्यास शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निश्चित करावयाचे प्रचलित निकष (प्राधान्यक्रम) scolarship exam
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ. 4 थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (UPS) इ. 7 वी परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमधून शासनमान्य मंजूर संचाइतके विद्यार्थी शिष्यवृत्तीकरीता अर्हताधारक म्हणून निवडण्यात येतात. शिष्यवृत्ती संच मर्यादित असल्याने एकूण शेकडा गुणांइतके कटऑफ शेकडा गुण मिळालेले सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतीलच असे नाही. अशा वेळी कटऑफ इतके एकुण शेकडा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमधून अर्हताधारक विद्यार्थी निश्चित करण्यासाठी पुढील निकष (प्राधान्यक्रम) विचारात घेण्यात येतात.
1) एकूणात समान शेकडा गुण परंतु तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी (पेपर क्र. 2) या पेपरमध्ये अधिक शेकडा गुण मिळविणारे परीक्षार्थी.
2) एकूणात समान शेकडा गुण आणि पेपर क्र. 2 मध्येही समान शेकडा गुण मिळाले असल्यास वयाने मोठा असलेल्या परीक्षार्थ्यास (ज्याचे वय जास्त आहे) प्राधान्य,
3) विद्यार्थ्याच्या प्रथम नावाचे आद्याक्षर (A TO Z)












1 thought on “इ.4थी 7वी शिष्यवृत्ती परीक्षा कट ऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाले असल्यास शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निश्चित करावयाचे प्रचलित निकष (प्राधान्यक्रम) scolarship exam ”