शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांची थकबाकी देयके shalartha id
संदर्भ शासन पत्र क्र. वेतन-११२५/प्र.क्र.१०७/टिएनटी-३ दि. २६/९/२०२५
उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्राची प्रत सोबत जोडली आहे.
उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्रान्वये शालार्थ आयडी नसलेल्या कर्मचा-यांचं वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील/रजा कालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करण्याबाबत बहुतेकदा मार्गदर्शनार्थ प्रस्ताव शासनास प्राप्त होत असतात.
२. याकीरता जिल्हानिहाय असे किती शालार्थ आयडी नसलेले कर्मचारी आहेत ज्यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्त्वावरील/रजाकालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक/कर्मचारी यांची ऑफल्वाईन् देयके सादर करावयाची आहे याची माहिती संकलित करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव सादर करणेबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहे.
सवव संदर्भिय शासन पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विभागातील जिल्हानिहाय असे किती शालार्थ आयडी नसलेले कर्मचारी आहेत ज्यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके, तासिका तत्वावरील/रजाकालावधीतील नियुक्ती केलेले शिक्षक/कर्मचारी यांची ऑफलाईन देयके सादर करावयाची आहे याची कर्मचारी निहाय माहिती सोबतच्या विवरणपत्रामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आपल्या भागाची जिल्हानिहाय माहिती संकलित करून तात्काळ संचालनालयास सादर करावी. शासनास माहिती सादर करावयाची असल्याने प्रथम प्राधान्याने कार्यवाही करावी.










