शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत shvr shasan paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२५-२६ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत shvr shasan paripatrak

स्वच्छ आणि हरित विद्यालय (SHVR) २०२५-२६ या मोहीमेबाबत केंद्रशासनाकडून पाठपुरावा

होत आहे. केंद्रशासनाकडून आयोजित केलेल्या Video Conference या बैठकीत याबाबत नाराजी

व्यक्त केलेली आहे. सदर मोहिमेचे उद्दिष्ट दि. ३०/०९/२०२५ पर्यंत १००% पूर्ण करणेबाबत संदर्भ५ अन्वये आपणांस कळविण्यात आले होते. केंद्रशासनाने या मोहिमेबाबत मुदत वाढूवन मिळालेली असल्याकारणाने दि. १५/१०/२०२५ पर्यंत स्वच्छ आणि हरित विद्यालय (SHVR) २०२५-२६ या मोहिमेचे १०० % पूर्ण करणेबाबत संदर्भ ६ अन्वये, आपणांस कळविण्यात आले होते.

स्वच्छ आणि हरित विद्यालय (SHVR) २०२५-२६ पोर्टलवरील प्रत्यक्ष आज दि. १३/१०/२०२५ रोजीची वस्तुस्थिती पहाता राज्यातील सहभागी शाळांची टक्केवारी ८८.००%, नोंदणी केलेल्या शाळांची टक्केवारी ८४.०० % व प्रक्रिया पूर्ण झालेल्या शाळांची टक्केवारी ६४.००% इतकी आहे.

यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, नोंदणी केलेल्या परंतु प्रश्नावली सादर न केलेल्या सर्व शाळांवर लक्ष केंद्रित करणेबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेश द्यावेत. स्वच्छ आणि हरित विद्यालय (SHVR) २०२५-२६ या मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता केंद्रशासनाकडून दि. १५/१०/२०२५ पर्यंतच मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदरहू काम करण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने प्राथम्याने याबाबत कार्यवाही करणेबाबत आपल्या स्तरावरून शाळांना आदेश द्यावेत.

Related posts:

Leave a Comment