विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ मतदार नोंदणी करीता विशेष शिबिरे आयोजित करणेबाबत sir matdar nondani vishesh shibir 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ मतदार नोंदणी करीता विशेष शिबिरे आयोजित करणेबाबत sir matdar nondani vishesh shibir 

संदर्भ :

१) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक- २३/२०२५-ERS (Vol-II), दिनांक १४.०५.२०२६.

२) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक- २३/२०२६-ERS (Vol-II),

दिनांक १९.०८.२०२६.

३) या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र दि.०४.०९.२०२६.

महोदय/महोदया,

भारत निवडणूक आयोगाच्या निदेशांनुसार, राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक ३१ ऑगस्ट, २०२६ ते ३० सप्टेंबर, २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्याकरीता निश्चित करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती व नाव वगळणीसाठी अर्ज सादर करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत या कार्यालयाच्या समक्रमांकाच्या दि.०४.०९.२०२६ च्या पत्रान्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या सूचनांचे कोटेकोरपणे अनुपालन करण्यात यावे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी राज्यातील मतदार यादीमध्ये एकूण ९.७८ कोटी मतदार होते. या पुनरिक्षणाच्या प्रारुप मतदार यादीमध्ये सुमारे १.५४ कोटी (१६%) मतदारांची नावे गैरहजर/स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ शकली नाहीत. गैरहजर/स्थलांतरित किंवा इतर कारणामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करु न शकलेल्या मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणांहून मतदार यादीमध्ये नव्याने नाव अंतर्भूत करण्यास दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये संधी उपलब्ध झालेली आहे. त्याच प्रमाणे ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला नसल्याने दि.०१.१०.२०२४ नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता आले नव्हते. आता, दि.०१.१०.२०२६ रोजी किंवा त्या पूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव अंतर्भूत करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

सबब, नवमतदार तसेच अन्यथा पात्र असून प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीमधील अस्तित्वात असलेल्या नोंदीमध्ये सुधारणा करणे तसेच यादीतील नावाची वगळणी करणे या करिता विशेष सखोल पुनरिक्षणाच्या दावे व हरकती कालावधीत विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निदेश देण्यात येत आहेत.

त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक १९, २०, २६ व २७ सप्टेंबर, २०२६ या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात यावीत.

२. विशेष शिबिरे आयोजित करताना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :-

२.१. सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या मतदार यादी भागासाठीच्या केंद्रांवर दिनांक १९, २०, २६ व २७ सप्टेंबर, २०२६ या दिवशी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत उपस्थित रहावे.

२.२. सदर शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याबरोबर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना संबंधित राजकीय पक्षांमार्फत देण्यात याव्यात.

२.३ या शिबिरांमध्ये मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरीकांचे मतदार नोंदणी,

दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज भरुन घेण्यात यावेत

२.४ विशेष शिबिरांबाबतची प्रसिद्धी सर्व प्रसार माध्यमांमार्फत करण्यात यावी, नागरिकांमध्ये त्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात यावा. तसेच नागरीकांना मतदार नोंदणीकरीता आवाहन करण्यात यावे.

२.५ जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी या अधिकाऱ्यांनीही काही विशेष शिबिरांना भेटी देऊन तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करावे.

२.६ सदर विशेष शिबिरांमध्ये महिला तसेच दिव्यांगांच्या समावेशनासाठी विशेष प्राधान्य देण्यात यावे.

२.७ प्रारूप यादीतील मतदारांची संख्या तसेच दिनांक ०१.०६.२०२६ रोजीची संभाव्य मतदार संख्या (Projected populations) विचारात घेऊन त्यामधील फरकानुसार जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करावी आणि पात्र मतदार हे यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करावे.

याव्यतिरिक्त दिनांक ०१.१०.२०२६ या अहर्ताकारी दिनांकानुसार ज्या नागरिकांना १८ वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि त्यांची मतदार म्हणून नाव नोंदणी होऊ शकलेली नाही अशा युवकांची संख्या मोठी राहणार असल्याने, त्यांच्याकरिता सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे व अशा नव युवा नागरिकांची नावे जास्तीत जास्तपणे मतदार म्हणून नोंदविता येतील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत व याबाबतचा आपला नियमित अहवाल या कार्यालयात सादर करावा, ही विनंती.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment